Akola News अकोला : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) चांगलाच समाचार घेतलाय. प्रकाशझोतात राहण्यासाठी काहींची कायम ‘कोल्हेकुई’ सुरू रहात असल्याचा टोला अमोल मिटकरींनी कोल्हेंना लगावलाय. अजितदादांनी (Ajit Pawar) सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्यानेच काहींच्या पोटात दुखत असल्याचं ते म्हणालेय. दरम्यान, अमोल कोल्हेंनी आपली खासदारकी सांभाळावी, त्यांनी महाराष्ट्र सरकार अन् अजित पवार काय करतायेत याची काळजी करू नये, असा टोलाही मिटकरींनी खासदार अमोल कोल्हेंना लगावलाय.
कलाकार हा रंगमंचावरच शोभून दिसतो- अमोल मिटकरी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो सर्व सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला ते पाहून काही चेले चपाटे कोल्हेकुई करू लागले आहेत. मात्र आम्हाला सल्ला देण्यापेक्षा त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण स्वत: इथवर कोणाच्या जीवावर पोहचलो आहे. कोणी आपल्याला पक्षात आणून मान सन्मान दिला, यांचे आत्मचिंतन त्यांनी केलं पाहजेल. उगाच केव्हाही उठून वाट्टेल ते बोलायचं आणि प्रकाशझोतात राहायचं असा प्रयत्न काही लोक करत आहेत. कलाकार हा रंगमंचावरच शोभून दिसतो. ग्राउंडवर उतरून अजितदादा काम करणारे आहेत. दुसरीकडे तुमच्यात शिवरायांबद्दल इतकीच आत्मीयता होती तर विशाळगड सारखे हिंसाचाराचे प्रकरण विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावात जी घटना घडली, त्या ठिकाणी जाण्याचं औदार्य आपण का दाखवलं नाही? असा सवाल आमदार अमोल मिटकरींनी खासदार अमोल कोल्हेंना केला आहे.
जनतेते उतरून काम करायचे असतात, ते अजितदादा कायम करत असतात. त्यामुळे कोल्हेकुई करणाऱ्या कुणीही नेत्याने महायुती बद्दल बोलावं आणि तोंडसुख घेऊ नये, असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले. आधीच आपली चादर फाटली आहे. ती अधिक फाटू नये याची काळजी घेण्याचा सल्ला ही त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना दिला आहे. ते अकोला येथे बोलत होते.
अकोट विधानसभा लढवणार का?
अकोला जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यात अकोला पश्चिम, बाळापूर आणि अकोटचा समावेश आहे. पक्षाने संधी दिल्यास अकोटमधून विधानसभा लढण्याची तयारी आहे. मी लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..