अकोला: अकोल्यात (Akola News) राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari आणि मनसेतला (MNS) वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करत टीकेची झोड सध्या होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर देत मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी अमोल मिटकरींवर जोरदार पलटवार केलाय.

आमदार मिटकरींची तुलना त्यांनी राखी सावंत हिच्याशी केलीय. मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे. आमच्या नेत्याला पळकुटा म्हणणारे मिटकरीच राडयाच्या दिवशी अकोला विश्रागृहाच्या बाथरूममध्ये लपले असल्याचं साबळे म्हणालेय. ते अकोला इथे बोलत होते. जय मालोकार यांच्या मृत्यूचा आज दहावा दिवसही झाला नसताना मिटकरी त्याच्या मृत्युचं राजकारण करत आहेत असंही मनसे जिल्हाध्यक्ष साबळे म्हणालेय.

मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत- पंकज साबळे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद संपता संपत नाहीये. अशातच आता मनसे नेते अमोल मिटकरींवर आणखी आक्रमक झाले आहेत. “अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल. अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिला आहे. तर दुसरीकडे अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी अमोल मिटकरींची तुलना राखी सावंत यांच्याशी करत  मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढत असल्याचे एकणात चित्र बघायला मिळत आहे.

20 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल 

दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींच्या वाहन तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपी असलेले दुसरे जिल्हाध्यक्ष राजेश काळे आणि  पदाधिकारी सचिन गव्हाळे यांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील सरकारी बगीचाजवळून त्यांना ही अटक करण्यात आलीय. या प्रकरणात आतापर्यत पोलिसांनी 7 जणांना अटकेत घेतले आहे. तर तिघांना या प्रकरणात जामिन मिळाला आहे. तर यातील एक संशयित आरोपी आणि मनसे पदाधिकारी असलेला जय मालोकार यांचा हृदय झटक्यानं मृत्यू झाला होता.

आतापर्यंत या प्रकरणात 20पेक्षा अधिक मनसेच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरार असल्याचे चित्र आहे. त्यांच्या शोध घेणासाठी अकोला पोलिसांचे तीन पथक तयार करण्यात आले असून ते मुंबईच्या दिशेने गेल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link