Nitin Deshmukh ACB Inquiry : अकोला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील (Akola News) बाळापुरचे ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Buero) आमदार नितीन देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानांच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली आहे.
अमरावतीच्या एसीबीच्या पथकाने अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. नितीन देशमुख जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषदेचा वापरलेला विकास निधी, झालेली कामे आणि सदस्य म्हणून घेतलेले भत्ते, याबद्दल संपूर्ण माहिती मागवली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उधाण
आमदार नितीन देशमुख हे 2009 ते 2019 या काळात अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. दरम्यानच्या काळात काही गैरप्रकार तर झाला नाही ना, त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. याआधी ‘अमरावती एसीबी’ने बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी 17 जानेवारी 2023 रोजी अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता परत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नितीन देशमुख यांच्या संदर्भातली फाईल उघडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
यवतमाळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कृषी सहाय्यक देण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं आहे. वारंवार मागणी आणि समस्या सांगूनही कुठलीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने आज एका शेतकऱ्याने कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांना फ़ोन केला असता ते उद्धटपणे बोलले, असा आरोप शेतकाऱ्याने केला आहे. अशातच हे संतप्त शेतकरी कृषी अधिकार्यांच्या कार्यालयात आले असता जिल्हा कृषी अधीक्षक गैरहजर असल्याने शेतकऱ्यांचा पारा आणखीन भडकला अन् कार्यालयात कपडे काढून त्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं.
पदभार असलेल्या अतिरिक्त कृषी सहायक अरेरावी करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत भ्रमणध्वनीवरून आंदोलक शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र समाधान न झाल्याने आंदोलक शेतकरी संतप्त होऊन त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..