Akola News अकोला : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज आपल्या विदर्भ दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात अकोल्यात (Akola News) येणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाशिमवरून राज ठाकरे अकोल्यासाठी निघाले आहेत. राज ठाकरे अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरच्या शुभमंगल कार्यालयात जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यावेळी ते अकोला जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा आढावा देखील घेणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या दोऱ्यानिमित्ताने मनसेनं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलीये. 

दरम्यान, मागच्या महिन्यात मनसे (MNS) आणि  आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात येत आहे. परिणामी, या राड्यावर राज ठाकरे काही बोलतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच अकोल्यातील एखादा उमेदवार ते जाहीर करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या कुटूंबियांनाही राज ठाकरे भेटतील  अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी 2 वाजता ते अकोल्यातील बैठक आटोपून बुलडाणा जिल्ह्यातील शेगावकडे प्रयाण करतील, अशी माहितीही पुढे आली आहे.

राज्यात मनसेसाठी पोषक वातावरण – राज ठाकरे

महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येतं नाही. मात्र आगामी काळात त्यांच्यात तिकीट वाटपावरून इतक्या हाणामाऱ्या होतील की पक्ष बेजार होतील. एक झलक आपण लोकसभेच्या वेळी बघितली. प्रत्येकालाच निवडणुकीसाठी उभं राहायचं असल्याचे चित्र सध्या त्यांच्याकडे दिसत आहे. असेअसले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी राज्यात पोषक वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळे राज्यात अधिकाअधिक जागा आम्ही लढणार असल्याचेही राज ठाकरे यापूर्वीच म्हणाले आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे अकोल्यातील एखादा उमेदवार ते जाहीर करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 6 उमेदवार

1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link