Akola Crime News अकोला : अकोला शहरातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यात अकोल्यातील भाजप (BJP) पदाधिकारी तथा बिल्डरवर चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा चाकू हल्ला (Crime News) केल्याची माहिती पुढे आली आहे. तर रामप्रकाश मिश्रा असे या हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असता त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक चाकू हल्ला केलाय.

काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. मात्र हा हल्ला नेमका का? आणि कुणी केला? हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळासह शहरातही मोठी खळबळ उडाली आहे.

अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ       

दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने त्यांचे वाहन चालक आणि नातेवाईकांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलेय. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री उशिरा त्यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया पार पडलीय. जमखी रामप्रकाश मिश्रा हे मुळ बिल्डर व्यावसायिक असून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. भाजपमध्ये  ते उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. मिश्रा यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचे मूळ कारण  हे अद्यापपर्यंत समजलं नाहीय. याप्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करत आहेत. मिश्रा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे राजकीय संघर्षापोटी तर हा हल्ला झाला नाही ना? अशी शंकाही वर्तवली जात आहे. मात्र पोलीस तपासात यातील अंतिम सत्य बाहेर येणार असले तरी सध्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक, दोन जखमी

महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे लोणी येथून संगमनेर शहरात एका कार्यक्रमासाठी येत असताना शहर पोलीस ठाण्याचे वाहन आणि पालकमंत्री विखे-पाटील यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांचे वाहन यांच्यात धडक झाली. या अपघातत महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे दोन जण जखमी झाले. रात्री नऊच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापुर येथील गणपती मंदिरासमोर हा अपघात घडला. सहायक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. तर महसूल मंत्री विखे-पाटील यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची रुग्णालयात येऊन भेट घेत योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

   

इतर महत्वाच्या  बातम्या 

अधिक पाहा..



Source link