अकोला : शिवसेनेतील फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आणि नंतर गुवाहाटीहून परत आलेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आले होते. मात्र त्यांच्याच बाळापूर मतदारसंघावरून आता महायुतीत ओढाताण सुरू झालीये. महायुतीतील (Mahayuti) तिन्ही प्रमुख पक्षांनी बाळापूरवर आपल्या दावा ठोकलाय. मात्र, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी कुणीही आपल्याविरोधात असलं तरी फरक पडणार नसल्याचं म्हटलंय. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघहा (Balapur Vidhan Sabha Constituency) विदर्भातील ठाकरे गटाचा आमदार असलेला एकमेव मतदारसंघ आहे. 2021 मधील राज्यातील ऐतिहासक सत्तानाट्यात हा मतदारसंघ आणि येथील आमदार देशभरात चर्चेत आलेय. याचं कारण ठरलंय सत्तानाट्यात शिंदे गटात गेलेले आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीतून परत येत उद्धव ठाकरेंची साथ देणं, हे होय. त्यानंतर आमदार नितीन देशमुखांनी सातत्याने एकनाथ शिंदे, त्यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य केलंय. त्यामूळे आता या मतदारसंघात देशमुखांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याची व्युहरचना महायुतीनं केलीये.
बाळापुर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह?
दरम्यान, अकोला जिल्ह्यात जागा वाटपावरून बाळापुर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह आहेत. भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. तर बाळापुर विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचा आमदार असल्याने या मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटानं मागणी केलीये. आता याच मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील दावा ठोकलाय. तर महायुतीतील एक घटकपक्ष असेलल्या जानकरांच्या रासपचीही बाळापुरात चाचपणी सुरूये.
महायुतीतील या पक्षांची ही नावे आहेत चर्चेत
भाजप : तेजराव थोरात, माजी आमदार बळीराम सिरस्कार, नारायण गव्हाणकर.
शिवसेना शिंदे गट : माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ आणि माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप
राष्ट्रवादी अजित पवार गट : युवा नेते संदिप पाटील आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे.
तिरंगी लढतीचा हाय व्होल्टेज ड्रामा
हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला मिळण्याचं जवळपास निश्चित आहे. नितीन देशमुख येथून परत शड्डूू ठोकून आहे. दरम्यान, बाळापुर मतदारसंघात महायुतीतून कोणीही निवडणूक लढावं, आपल्याला भीती नसल्याचं आमदार देशमुख म्हणालेय.अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपचे आमदार आहे. त्यामूळे बाळापूर ताबा मिळविण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशा तिरंगी लढतीचा हाय व्होल्टेज ड्रामा रंगणारेय.
2019 मधील बाळापूर मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवार पक्ष मिळालेली मते
नितीन देशमुख शिवसेना 69,343
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर वंचित 50,555
डॉ. रहमान खान एमआयएम 44,507
विजयी : नितीन देशमुख : शिवेसना
हे ही वाचा
अधिक पाहा..