School Holidays 2024: सप्टेंबर महिना संपायला अजून चार दिवस उरले आहेत. हा महिना सणांसोबतच सुट्यांचाही निघाला आहे. तर ऑक्टोबर हा सुट्टीचा महिना असणार आहे.ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खूप सण आहेत. त्यामुळे शालेय मुलांच्या आनंदाला सीमा राहणार नाही कारण त्यांना भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. यामध्ये गांधी जयंती, नवरात्री, दसरा आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांचा समावेश आहे.

ऑक्टोबर महिन्यात सरकारी कार्यालये फक्त 20 दिवस सुरू राहतील आणि 11 दिवस सुट्या असतील. ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधींची जयंती, शारदीय नवरात्री, त्यानंतर दसरा, त्यानंतर करवा चौथ ते दिवाळी असे विशेष सण आहेत. यानिमित्त शासकीय सुट्ट्याही असतील. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना किती सुट्ट्या असतील? याबद्दल जाणून घेऊया.

ऑक्टोबरमध्ये या दिवशी शाळांना सुट्ट्या

1 ऑक्टोबर : जम्मूमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे या दिवशी बँका बंद राहणार आहेत. या राज्यापुरती ही सुट्टी मर्यादित असेल.
2 ऑक्टोबर : हा दिवस गांधी जयंती आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल.
3 ऑक्टोबर : नवरात्रीची सुरुवात आणि महाराज अग्रसेन जयंती. त्यामुळे देशभरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि बँका बंद राहणार आहेत.
6 ऑक्टोबर : रविवार असल्याने सार्वजनिक सुट्टी असेल. त्यामुळे बँका, महाविद्यालये, शाळा, सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
10 ऑक्टोबर : या दिवशी महासप्तमी असून त्यानिमित्त अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी आहे.
11 ऑक्टोबर : महानवमीनिमित्त या दिवशी देशभरात सुट्टी असेल.
12 ऑक्टोबर : दसरा आहे. विजयादशमीमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल. याशिवाय महाविद्यालये, शाळा आणि कार्यालयेही बंद राहतील.
13 ऑक्टोबर: हा दिवस रविवार आहे.
17 ऑक्टोबर : या दिवशी महर्षी वाल्मिकी, कांती बिहूनिमित्त देशातील अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
20 ऑक्टोबर : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल.
26 ऑक्टोबर : चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहणार आहेत.
27 ऑक्टोबर : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असणार आहे.
29 ऑक्टोबर : दिवाळीनिमित्त मंगळवारी सुट्टी आहे.
30 ऑक्टोबर: दिवाळीनिमित्त सुट्टी.
31 ऑक्टोबर : नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त या दिवशी सुट्टी असेल.

प्रत्येक राज्याप्रमाणे तेथे साजरे होणारे सण वेगळे असतात. त्यानुसार संबंधित राज्यातील शाळांना सुट्टी दिली जाते. त्यामुळे तुमच्या पाल्ल्याला शाळेत सुट्टी आहे की नाही? हे शाळेच्या डायरीत तपासावे लागेल. तसेच शाळेच्या शिक्षकांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकेल.





Source link