Ladki Bahin Yojana : सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojan) आणलीय. मात्र, अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा ‘लाडक्या भावांनी’ केला आहे. या योजनेसाठी असलेल्या ‘नारीशक्ती दूत’ अॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरलाय. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आलीय. यात या सहा पुरूषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय. या सहाही जणांना याचा खुलासा मागविण्यात आलाय. यानंतर त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणारेय. दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांचा डल्ला!
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरू केली आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत. यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची (ladki bahin yojana) नोंदणी अजूनही सुरूच आहे. या योजनेचा (ladki bahin yojana) लाभ मिळवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डचा नंबर वापरून गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे. याप्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी 30 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या प्रकरणात, संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान असाच एक गैरप्रकार अकोल्यातून पुढे आला असून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (ladki bahin yojana) योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेसाठी राज्यात्या कानाकोपऱ्यातून ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एकाच महिलेच्या नावाने 28 अर्ज भरण्यात आले आहेत. यापैकी केवळ एक अर्ज मंजूर झाला आहे. उर्वरित 27 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात दाम्पत्याने बनावट कागदपत्रे दाखवून अनेक अर्ज भरल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून केला जाईल त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..