Sanjay Maharaj Pachpore बुलढाणा : आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची खरी आणि सर्वात मोठी समस्या आहे.  आजच्या राजकारण्यांना स्वार्थ आणि लोभ असल्याने त्यांना रामराज्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका करत  ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ प्राप्त गुरुवर्य संजय महाराज पाचपोर (Sanjay Maharaj Pachpore) यांनी राजकारण्यांचे कान टोचले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राम राज्यात न्याय व्यवस्था नव्हती , हीच राम राज्याची खरी ओळख असल्याचे म्हटले आहे.  

‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार- 2024’ प्राप्त आणि विदर्भाचे ज्येष्ठ संत ह भ प संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल बुलढाणा (Buldhana News) आणि अकोला (Akola) जिल्ह्यातील वारकऱ्यांनी त्यांचा आज बुलढाण्यातील वरवट बकाल येथे सत्कार ठेवला होता. त्यावेळी त्यांनी “एबीपी माझा” शी बातचीत केली. त्यावेळी ते बोलत होते.

राम राज्यात न्याय व्यवस्था नव्हती , हीच राम राज्याची खरी ओळख

राज्य शासनाचा संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मला एकट्याला मिळाला नाही तर हा पुरस्कार संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आहे.  क्रांती ही अध्यात्माशिवाय होत नाही , या देशाला आज सात्विक कामाची गरज आहे. देशात आज अल्पवयीन मुलींवर आत्यचार करणार आजचा समाज हा विकृत करत आहेत. या देशाला लागलेली ही कीड आहे. याची फक्त आपण निंदा करतो. तसेच आजची राजकीय व्यवस्था हीच समजासमोरची मोठी आणि खरी समस्या आहे. राजकीय व्यवस्थेने व्यवस्था म्हणूनच राहावं, समस्या बनून नव्हे आणि दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली असल्याची खंतही संजय महाराज पाचपोर यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

ज्या राज्यात ज्या देशात न्यायाची व्यवस्था नसते, त्याला रामराज्य म्हणतात. रामराज्यात न्यायाची व्यवस्था नव्हती, ज्या वेळी समस्या असतात त्यावेळी व्यवस्था असते. जिथं अन्यायच नसतो तिथं न्याय व्यवस्था नसते. ज्याच्या समोर फक्त देश असतो त्याच्या समोर ही समस्या नसते. पण ज्याला पदाचा लोभ आणि स्वार्थ असतो तो समस्या निर्माण करतो. सध्याच्या युगात राजकारण्यांना लोभ आणि स्वार्थ असल्याने ते राम राज्य आणण्याबद्दल एकणार नाहीत. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोण आहेत संजय महाराज पाचापोर ?

ह.भ.प.संजय महाराज पाचपोर हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत म्हणून ओळखले जातात. पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात संजय महाराज पाचपोर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर पश्चिम विदर्भातील राजकीय मंडळीही संजय महाराज पाचपोर यांच्या कायम संपर्कात असतात. अलीकडेच राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा मानल्या जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link