PM Modi In AKola : काँग्रेसचे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यांची संविधान निर्माता ही ओळख काँग्रेसला खुपते कारण ते दलित मातेचे सुपूत्र होते. माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सदा-सर्वदा पूजनीय आहेत. आम्ही देशभरात त्यांची स्मारकं उभारली. काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसींची प्रगती पाहू शकत नाही. काँग्रेस दलितांमधील जातीजातीत भांडणं लावत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अकोल्यामधील सभेतून केली. मोदी यांनी महाविकास आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, पवार ठाकरेंच्या तुलनेत त्यांच्या भाषणातील सर्व रोख काँग्रेसवर दिसून आला. मोदी यांनी पुन्हा एकदा ‘एक है तो, सेफ है’ सांगण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र सरकार कसं असेल याची झलक आमच्या जाहीरनाम्यात
मोदी यांनी सांगितले की, कापूस उत्पादकांची स्थिती आता सुधारत आहे. विदर्भात टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जननी म्हणजे काँग्रेस आहे महाराष्ट्र आणि विदर्भात पाण्याचं संकट वाढलं, परंतू काँग्रेसवाले घोटाळ्यात मग्न राहिले. महायुतीचं सरकार आल्यावर सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. महाराष्ट्र सरकार कसं असेल याची झलक आमच्या जाहीरनाम्यात आहे. महायुतीचे सरकार, करील स्वप्नं साकार असे ते म्हणाले.
महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, खंडणी
अकोल्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महायुतीच्या जाहीरनाम्यात महाआघाडीच्या घोटाळ्याचे पत्रही आले आहे. आता संपूर्ण देशाला माहित आहे की महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, खंडणी, महाआघाडी म्हणजे टोकन मनी. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटणाऱ्या मराठीला भाषेचा दर्जा देणे हा बहुमान आहे, महाराष्ट्रातील जनतेची मागणी मोदीने पूर्ण केल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “केंद्रातील आमच्या नवीन सरकारने लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करून केवळ 5 महिने झाले आहेत. त्यात महाराष्ट्राशी संबंधित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वाढवण बंदराची पायाभरणी काही दिवसांपूर्वी झाली होती, आज एकट्या वाढवण बंदराची क्षमता भारतातील सर्व बंदरांच्या दुप्पट होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..