Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसतायत. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) आज बाळापुरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद नातिकोद्दीन खतीब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आहे.

अशातच अकोल्यातील मन नदीच्या काठावर असलेल्या हेलिपॅडवर आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. दरम्यान, राज्यातील नेत्यांच्या बॅगांच्या होत असलेली तपासणी योग्य असल्याचे भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आधीच केली व्यक्त केली होती. मात्र, राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पैसे पोहोचवण्याचं काम निवडणूक विभाग आणि पोलीस करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. बाळापुरातील पत्रकार परिषदेत बोलत असतांना त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

मुंबईतील 1992 च्या बाँबस्फोटातील 300 लोक अद्याप बेपत्ता

आकोला जिल्ह्यातील बाळापुर येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप करत विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत 1992 मध्ये बाँबस्फोट झाला होता. त्यात जवळपास 1 हजार मुस्लिम मारले गेले होते, त्यातील जवळ जवळ 300 लोक आतापर्यंत बेपत्ता आहेत. काँग्रेस सरकारने श्रीकृष्ण आयोग बसवला होता. त्यानंतर या आयोगाने अनेकांवर दोषारोप केले होते. या दोषरोपानंतर काँग्रेस सरकारने नसीम आरीफखान यांना याचिकाकर्ता केले.

तर यातील सुनावणीत महाराष्ट्र सरकारने शपथपत्रात म्हटले की आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, म्हणून सीबीआय चौकशी व्हावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसी अंमलात आणण्याचे वचन दिले होते. मात्र या याचिकेला महाराष्ट्र सरकारने गांभिर्याने चालवले नाही. त्यामूळे 12 ऑगस्ट 2012 ला कोर्टाने यातील कागदपत्र न पुरवल्याने कोर्टाने ही केस डिसमिस्ड केली. यानंतरच्या सरकारांनी याला नजरअंदाज केले असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

आरोपीत बाळासाहेब  ठाकरे, शिवसेनेचाही समावेश- प्रकाश आंबेडकर  

यानंतरच्या सरकारांनी देखील याला नजर अंदाज केले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माझा सवाल आहे की 1 हजार हत्या आणि कित्येक बेपत्ता हे कुणी घडवून आणले. यातील आरोपींत बाळासाहेब  ठाकरे, शिवसेना होती. आज त्याच सेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. 20 तारखेपुर्वी या प्रकरणात काँग्रेसने पुढाकार का घेतला नाही? यावर स्पष्टीकरण द्यावे. यातील मृत 1 हजार लोकांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच या प्रकरणात शरद पवारांचा रोल काय होता? हे शोधावं. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link