Akola Vidhan Sabha Election 2024 : अकोल्यात (Akola) मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. त्यासाठी कारण ठरलंय ते मनसे उमेदवार. झालं असे की मुर्तीजापुर मतदारसंघाचे मनसेचे (MNS) उमेदवार भिकाजी अवचार यांनी भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर मनसेमध्ये भिकाजी अवचारांनी घेतलेल्या भूमिके विरोधात मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवचारांनी भाजपला पाठिंबा जाहीर करताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोनवर शिवीगाळ केलीए. त्याची एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतोय. 

दरम्यान, मनसेचे उमेदवार भिकाजी अवचार हे सध्या नॉट रिचेबल आहेत. ते मिळाल्यानंतर मनसे स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देऊ. असा थेट इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिलाय.

मनसे उमेदवाराचा परस्पर भाजपला पाठिंबा, मनसैनिक संतापले

संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीची(Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी आज रंगते आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाआघाडी महाविकास आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी 6 वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान अकोल्याच्या मुर्तीजापुर मतदारसंघाचे मनसे उमेदवाराने परस्पर भाजपला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले असून अनेक उलट सुलट प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहे.  

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील कुटासा गावात सहकूंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांचं गाव हे अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात येतंय. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई आणि पत्नीनंही मतदान केलंय. मिटकरी़नी कुटासा गावातील शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केेेेलंय. अकोटमधून महायुतीने भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना तिसर्यांदा संधी दिलीये. तर येथून वंचितचे दीपक बोडखे आणि काँगेसचे महेश गणगणे रिंगणात आहेयेत. याच मतदारसंघावर महायुतीकडून अमोल मिटकरींनी दावा केला होता. मात्र , अजित पवारांना हा मतदारसंघ सुटला नाहीये. दरम्यान, राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link