Maharashtra Assembly Election 2024 अमरावती : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यंदा भाजपने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाल्याचे चित्र असून धक्कादायक निकाल आले आहे. यात अचलपूर मतदारसंघात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके, बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी झाले आहे. 

दरम्यान, अमरावतीत महायुतीलला मिळालेल्या यशाचे श्रेय नवनीत राणा यांना दिलं जात असून त्या किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर स्वत:नवनीत राणांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मी किंगमेकर नव्हे तर आमचे विचार किंगमेकर आहेत. जो विचार घेऊन आम्ही लोकसभा आणी विधानसभा लढलो. या विजयाचे श्रेय बराच अशा लोकांना आहे, ज्यांनी पडद्यामागे राहून काम केलंय. मात्र यावेळी पहिल्यांदा पाडण्यासाठी नाही तर निवडून आणण्यासाठी काम झालंय. बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री बनायचं होतं. त्यात बच्चू भाऊंना इतकंच सांगेल की जरा कमी बोलले असते, अगाऊपणा कमी केला असता, तर आज ते आमदार राहिले असते. असा टोला ही  नवनीत राणांनी बच्चू कडू यांना लगावला आहे.

माझ्या नणंद बाई खूप कमाल आहे- नवनीत राणा 

दुसरीकडे तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या मतदारांनी मला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं, त्या सर्व मतदारांचे मी आभार मानते असं त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आश्चर्यजनक आहेत, हे अपेक्षित नव्हते असे त्या म्हणाल्या. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली, हे समजण्याच्या पलीकडे आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात झाल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. दरम्यान यावर आता नवनीत राणांनी प्रतिक्रिया देत बोचरी टीका केली आहे. माझ्या नणंद बाई खूप कमाल आहे. त्या ज्या पद्धतीने दबावाचे राजकारण करत होत्या त्याला काँग्रेसचे लोकं कंटाळले होते. त्यांनी राजेश वानखडे यांचं काम केलं. असे त्या म्हणाल्या.

माझी इच्छा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी- नवनीत राणा  

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले त्याला नवनीत राणा यांनी उत्तर देत म्हणाल्या की, ते निवडून आले तर लोकशाही जिवंत आणि आम्ही आलो तर लोकशाहीवर अत्याचार हा कुठला न्याय? रवी राणा यांना पुढे जाताना पाहून बायकोला आनंद होतोच. सगळ्या बहिणींची मी मनापासून खूप आभारी आहे. आमचं पहिलं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री झालेलं पाहणं. मी जास्त अपेक्षा करत नही. माझी इच्छा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाहायची आहे. असेही नवनीत राणा म्हणाल्या. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link