अमरावती : एकीकडे राज्यातील महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होत असून ज्या आमदारांची नावे समोर आली, त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. तर, अनेक मतदारसंघात नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे. त्यातच, भाजप नेत्या नवनीत राणा यांचे पती आणि भाजपासोबत सहकारी असलेल्या स्वाभिमान पक्षाचे बडनेरा आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडल्याने राणा दाम्पत्याची नाराजी झाली आहे. त्यातूनच नवनीत राणा यांनी ठेवलेलं स्टेटस सध्या चर्चेत असून त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, त्यांनी संयम आणि संघर्ष यावर भाष्य केलं आहे.

भाजपच्या महिला नेत्या नवनीत राणा यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवरुन नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण, मंत्रिपदासाठी फोन न आल्याने किंवा यादीत नाव न लागल्याने आमदार रवी राणा हे नाराज झाले असल्याची माहिती मिळतेय. त्यातच, दुसरीकडे त्यांच्या पत्नी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ आपल्या स्टेटसवर ठेवला, जो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नवनीत राणा म्हणताय की, जिंदगी हे लढाई जारी हे… यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तसेच, आपल्या स्टेटसवरुन नवनीत राणा यांना नेमकं काय सुचवायचं आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि मतदारसंघात सुरू आहे.

रामदास आठवलेही नाराज, मंत्रिमंडळात रिपाइंला स्थान नाही

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार होतोय, मात्र मला त्याचं निमंत्रणही नसल्याचे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले. निवडणुका आल्या की मला बोलावलं जातं. आमच्या पक्षानेही निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. महायुतीचा मोठा विजय झाला महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. लोकसभेला एकही जागा दिली नाही, विधानसभेलाही एक जागा देऊ असे म्हटले. मात्र तसेही झाले नाही. विस्तारा दरम्यान मला एक MLC देऊन एक मंत्रीपद देऊ असे आश्वासन दिले होते.मात्र आम्हाला मंत्रीमंडळ विस्तारात स्थान नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत, असे म्हणत आठवले यांनी देखील आपली नाराजी उघड केलीृ. 

हेही वाचा

होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

 

अधिक पाहा..



Source link