Krushi Mahotsav Amravati : अमरावतीत कृषिमहोत्सव, सरकारच्या कृषी धोरणावर शेतकऱ्याची रोखठोक मतं
अमरावतीत कृषी महोत्सवात शेतकऱ्याचा संताप.. सरकारच्या धोरणावर केली टीका.. शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल.. अमरावती शहराच्या सायन्स्कोर मैदानात पाच दिवसीय कृषी महोत्सव चालू आहे, या ठिकाणी दररोज हजारो शेतकरी उपस्थिती लावत आहे, मात्र या ठिकाणी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे.. सरकारच्या धोरण, सरकारचं आयात निर्यात धोरण, शेतमालाला हमीभाव, तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पिक विमा बाबत शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केल्याने यावर या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला.. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्यात तुफान वायरल होत आहे, सध्याची शेतकऱ्यांची स्थिती मांडली त्यामुळे अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहे, हा शेतकरी अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे येथील असून या शेतकऱ्याने कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आपल्या अडी अडचणी समस्या सांगून अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधलं होतं…