Mahendra Thorve On Sunil Tatkare : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले हे दोघेही रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. दोघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खबबळ उडाली आहे. 

शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत. त्यांचे वास्तव्य सुतारवाडीत आहे. आमच्या आमदारांमुळे ते खासदार झाले आहेत. आता लोकसभा आम्ही लढवणार आहोत. सुनील तटकरे यांना ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही असे आव्हान थेट सुनील तटकरे यांना महेंद्र थोरवे यांनी दिलं आहे. अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

कॅप्टन कूल असला तरी स्पर्धा जिंकता येते

यावेळी क्रिकेटचे उदाहरण देत महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर टीका केली. क्रिकेटच्या खेळात पंचांचा निर्णय अंतिम असतो. कॅप्टन कूल असला तरी स्पर्धा जिंकता येते असं ते म्हणाले. जरी कॅप्टन कूल असला तरी त्याने सोबतच्या खेळाडूंना प्राधान्य देणे गरजेचे असते. त्यामुळे आपण कॅप्टन व्हायला चाललो आहे. माझीच मुलगी खेळाडू, माझाच मुलगा खेळाडू, सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात असं चालणार नाही. पंचांनी निर्णय दिला असला तरी आज क्रिकेट पुढे गेलं असून यामध्ये थर्ड अंपायर आहे असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. 

आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजीत केलेल्‍या दमदार आमदार चषक क्रिकेट स्‍पर्धेच्‍या उदघाटन प्रसंगी आमदार बांगर बॅट घेवून मैदानात उतरले. यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. आमदार महेंद्र थोरवे यांनी गोलंदाजी केली. स्‍पर्धेच्‍या उदघाटन प्रसंगी आरोग्‍यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. 





Source link