Shaktipith Mahamarg: शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेत विसंगती पाहायला मिळतेय.कारण एका बाजूला अंबादास दानवे हे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देताय. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव हे या महामार्गाला पाठिंबा देताय.
शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतंय.नागपूर ते गोवादरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला भास्कर जाधव यांनी समर्थन दिलं आहे. तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं म्हटंलय.
भास्कर जाधव यांनी शक्तिपीठ महामार्गाला दिलेल्या समर्थनानंतर शक्तिपीठ महामार्गाचे गिरीश फोंडे यांनी भास्कर जाधवांवर टीका केलीय. भास्कर जाधव अज्ञानी असल्याचा टोला त्यांनी लगावला.
विकासाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, सत्तेत बसलेले लोकच या महामार्गाला विरोध करत होते.आता तेच लोक निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करतय, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.दरम्यान ज्या शक्तीपीठ महामार्गावरुन वाद निर्माण होतोय..
तो शक्तिपीठ महामार्गाचं प्रकरण काय.
शक्तिपीठ महामार्गाचा काय आहे वाद!
नागपूर ते गोवा शक्तीपीठी महामार्गाची लांबी ही 802 किलोमीटर आहे. प्रकल्पाचा भूसंपादनासह खर्च सुमारे 86 हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे.कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी या तीन शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे. शक्तिपीठ महामार्ग एकूण 12 देवस्थानांना जोडणार आहे. या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500 एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तसंच राज्यातील अनेक पक्षांनी देखील या महामार्गाला विरोध केलाय.मात्र, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत या महामार्गाबाबत नेत्यांचं एकमत नसल्याचं समोर आलंय.