Beed Crime: सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेत. गुन्हे दाखल झाल्यापासून गेल्या चार दिवसांपासून खोक्या फरार आहे. खोक्याला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाहीय. त्यामुळे खोक्याच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याची चर्चा सुरू झालीय.बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तिला मारहाण केल्या प्रकरणी बीडच्या सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुंड खोक्यावर हे गुन्हे दाखल झालेत.. यात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत पहिला गुन्हा नोंदविलाय. तर बावी परिसरात ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मात्र गुन्हे दाखल होऊन चार दिवस झाले तरी खोक्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीय..शिरूर पोलीस ठाण्याची दोन पथकं खोक्याला पकडण्यासाठी रवाना झालीयत.. मात्र खोक्या पोलिसांच्या हाती लागलेला नाहीय.. व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओ प्रकरणात खोक्यावर शिरूर पोलिसांत 2 गुन्हे दाखल आहेत. मात्र याआधीही खोक्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय..

आतापर्यंत खोक्यावर किती गुन्हे दाखल?

शिरूर – एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी 2 गुन्हे 
शेवगाव – कौटुंबिक हिंसाचार आणि सदोष मुष्यवधाचा गुन्हा
पाटोद्यातील अमळनेर – खुनाचा प्रयत्न, मारहाण, घातक शस्त्राने मारहाण, बेकादेशीर जमाव जमवून दंगा घडवून आणण्याचा गुन्हा
नेवासा – सदोष मनुष्य़वध, दंगा घडवून आणण्यासंदर्भात गुन्हा
पाथर्डी – अपहरणाचा गुन्हा
शिरूर –  घातक शस्त्राने मारहाण, बेकादेशीर जमाव जमवून दंगा घडवून आणण्यासंदर्भात गुन्हा

असे एक ना अनेक गंभीर गुन्हे आतापर्यंत सतीश भोसले उर्फ खोक्यावर दाखल आहेत.बॅटने मारहाण केल्या प्रकरणी चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालाय. मात्र या आधी खोक्यावर जे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते त्यावर खोक्यावर का कारवाई केली गेली नाही.? एवढे गंभीर गुन्हे दाखल असतानाही खोक्या मोकाट का फिरत होता?.सोशल मीडियावर शोबाजी करणारा खोक्या पोलिसांना कसा सापडला नाही.असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होताहेत. आता चर्चा झाल्यानंतर आणि माध्यमांनी विषय़ उचलून धरल्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झालीय. मात्र चार दिवस खोक्या पोलिसांच्या हाती सापडले नाहीय. त्यामुळे खोक्या गेला कुठे असा प्रश्न उपस्थि होतोय.

खोक्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास होता. वनविभागाच्या जागेवर त्याने एक ग्लास हाऊस उभारलंय. त्याचे एक एक कारनामे समोर आल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली. खोक्या भाई रहात असलेल्या परिसरात वनविभागाने कारवाई करत अतिक्रमण उठवले. इतरांच्या झोपड्या वनविभागानं हटवल्या. खोक्याच्या ग्लास हाऊसवर मात्र अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाहीय.

खोक्याच्या ग्लास हाऊसवर हातोडा कधी?

खोक्या राहत असलेली शिरूर तालुक्यातील झापेवाडीची जागाही वनविभागाची आहे. खोक्या अनेक वर्षांपासून वन विभागाच्या हद्दीत  अतिक्रमण करून वास्तव्याला होता.खोक्यासह त्याचं कुटुंबही इथेच वास्तव्याला होतं. अनेक वर्ष वनजमिनीत अतिक्रमण असूनही वनविभागाने कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारला जातोय.सर्वसामान्यांनी वनविभागाच्या नियमांचं उल्लंघन केलं तर वनविभागाकडून तत्काळ कारवाई करण्यात येते. मात्र खोक्यावर एवढ्यावर्षांपासून का कारवाई केली गेली नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. तर वनविभागाने तक्रार केल्यास कारवाई करू असं शिरूर पोलिसांनी म्हटलंय. एवढ्या वर्षात वनविभागाने खोक्याला अभय दिलं होतं का? की जाणिवपूर्वक डोळेझाक केली हा प्रश्न निर्माण होतोय. खोक्याचे एवढे कारनामे समोर येऊनही अद्याप त्याचा क्लास हाऊसवर कारवाई करण्यात आलेली नाहीय. वन विभाग खोक्याच्या क्लास हाऊसवर हातोडा कधी टाकणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.





Source link