Nashik Crime News : पैसा सुरक्षित राहावं म्हणून तो आपणं बँकेत ठेवतो.. शिवाय, बँकेच्या इतर योजनांमधून ठेवींवर अतिरिक्त नफा मिळावा असाही अनेकांचा हेतू असतो. नागरिक आपल्या मेहनतीची जमापुंजी निर्धास्तपणे बॅंक खात्यात जमा करतात. पण बँकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच तुमची फसवणूक झाली तर? हो असंच काहीसं झालंय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव भागात. बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला आहे. 

कळवण भागातील ॲक्सिस बँकेतील कर्मचारी तुषार गोसावीनं ललिता मोरे या ग्राहकाकडून बँकेतील व्यवहारांसाठी तूषारनं एटीएम, मोबाईल बँकींगची माहीती घेतली. दरम्यान त्यांनं ग्राहकाची एकूण 15 लाखांची फसवणुक केली.
तर दुसरीकडे मालेगावमध्ये आकाश नामदेव इंडाईत यानं महिला बचत गटाचे खोटे कारण सांगून सहीचे, रक्कम नसलेले कोरे चेक घेतले. त्यातून पैसे काढून काही रक्कम त्याने ईएमआय स्वरूपात मनमाड शाखा येथे भरली. त्यापैकी 19 लाख 28 हजार 407 रुपयाची रक्कम अद्याप भरली नाही.. पोलिस या सगळ्याचा तपास करत आहेत.

फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?

बँकेतील कर्मचारी थेट तुमच्या घरी येऊन तुम्हाला थेट व्यवहाराच्या सोयी उपलब्ध करून देत असेल तर सावधन व्हा.  तुमच्या बँकेतील अकाउंटमध्ये एफडी करण्यासाठी तुमच्या घरी येत असतील तर त्यांच्या आमिशाला बळी पडू नका. तुमचं डेबिट कार्ड आणि मोबाईल अॅप सुरू करून देण्याच्या नावानं पासवर्ड मागत असतील तर देऊ नका.
अशा प्रकरणांमध्ये लोकांचे कोट्यावधी रुपये लुटण्यात आलेत. अनेकांना अद्याप ते मिळाले नाहीत त्यामुळे बँकेतील व्यवहार करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी सांभाळूनच व्यवहार करा.. अन्यथा तुमचे बँक खाते साफ होण्यास वेळ लागणार नाही.





Source link