Miniter Shivendra Raje Bhosale: ‘बिग बॉस’ फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचुकले यांनी कठोर शब्दांमध्ये आपला संपता व्यक्त करताना थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंवर निशाणा साधला आहे. 29 मार्चच्या रात्री घडलेल्या एका घटनेवरुन बिचुकलेंनी संताप व्यक्त केला आहे.

29 मार्चला काय घडलं?

29 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता. त्या दिवशी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणात करून गाण्याचे कार्यक्रम केले, असं अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानात दिवशी डॉल्बी लावून गाणे वाजवत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे, असंही बिचुकलेंनी घडलेल्या प्रकारावरुन टीका करताना म्हटलंय.

लज्जास्पद गोष्ट आहे

“एक गोष्ट ठणकावून सांगतो, 29 मार्च आमवस्या होती. त्या आमवस्याला आमचे छत्रपती, धर्मवीर श्रीमंत संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता. शिवेंद्रराजे मी तुम्हाला ठणकावून प्रश्न विचारतो, तुम्ही त्या राजघराण्यात जन्माला आलात याची भनक आपल्याला आहे का?” असा सवाल बिचुकलेंनी उपस्थित केला आहे. “छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या दिवशी तुमच्या टुकार कार्यकर्त्यांनी जो डॉल्बीचा दणदणाट केला, त्याला तुमचा होकार होता. नाच-गाण्याचे कार्यक्रम लागले 29 मार्चला. तुमचा वाढदिवस होता 30 मार्चला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला तुम्ही वाढदिवस साजरा करत असाल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे छत्रपती घराण्याला आणि शिवेंद्रराजे या नावाला,” असा हल्लाबोल बिचुकलेंनी केला. 

मंत्रिपदाचा राजीनामा द्या

मंत्री शिवेंद्रराजे यांचा वाढदिवस 30 मार्चला असतो शिवेंद्रसिंहराजे तुम्ही राजघराणात जन्माला आला त्याची तुम्हाला किंमत आहे का? असा सवालही बिचुकलेंनी उपस्थित केला. “छत्रपतींची वैचारिक वारस म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला तुम्ही जो डॉल्बीचा जो दणदणाट केला याची जाणीव असेल तर तुम्ही आता मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या. छत्रपतीच्या घरात जन्माला येऊन तुम्ही संभाजी महाराजांचा अपमान करता. अरे, 30 मार्चला तुम्ही काहीही केलं असतं तर मी काही बोललो नसतो. दुसरी गोष्ट पत्रकारांकडून कळली की तुम्ही अनधिकृत बॅनर लावले आहेत. हा पहिला वाढदिवस तुम्ही एवढा मोठा साजरा करता कारण तुम्हाला मंत्रिपद मिळालं, हे नशीब समाजा. तुमच्या या यशामध्ये अभिजित बिचुकलेचा फार मोठा वाटा आहे, वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी येतील बाहेर,” असं बिचुकलेंनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp