Ashwini Bidre Murder: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्वीनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात आज शनिवारी पनवेल येथील सत्र न्यायालयात निकाल जारी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा आरोप अभय कुरुंदकर यांच्यावर आहे. त्याचबरोबर आणखी चार जणांवरही आरोप आहेत. सर्व आरोपी गेल्या सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या. 

अश्विनी बीद्रे या सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी काम करत होत्या. 11 एप्रिल 2016 रोजी  अश्विनी ड्युटीसाठी घराबाहेर पडल्या होत्या मात्र नंतर त्या परतल्याच नाहीत. अश्विनी रहस्यमयरित्या घरातून गायब झाल्या होत्या. त्यानंतर 14 जुलै 2016 रोजी त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने त्यांचे पती राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत 4 ऑक्टोबर 2016 रोजी याचिका दाखल करण्यात आली. 

 २७ ऑक्टोबर २०१६ ला न्या. ए एस ओकसाहेब आणि ए ए सय्यद साहेब  यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना डिसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली टीम नियुक्त करून तत्काळ अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला. ३१ जानेवारी २०१७ ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वर कंळबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा  दाखल करण्यात आला. या प्रकरणात अभय कुरुंदकरचा खासगी ड्रायव्हर आणि त्याचा मित्र महेश फळणीकर यांनाही अटक करण्यात आली. 

अश्विनी बिद्रा बेपत्ता झाल्याच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2018 ला अश्विनीचा खून झाल्याचं उघडकीस आले. 1 मार्च 2018 खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आणि 19 मे 2018 ला चार्जशीट दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

2016 रोजी अश्विनी यांची मीरा रोड येथे हत्या करण्यात आली. त्यानंतर लाकूड कापायच्या मशीनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले व ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले, असा आरोप करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी कुरुंदकर यांनी अश्विनी यांच्या मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकून दिले होते. मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी वसई खाडी मध्ये शोध मोहीम घेण्यात आली. परंतु कोणतेही पुरावे सापडले नाही. अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत होता. 

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. आरोपी कुरुंदकरला कोर्टात आणलं असून पनवेल सत्र न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp