अकोला : काश्मिर खोऱ्यातील पहलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी (Terrorist) हल्ल्यांमध्ये 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला . या दुर्घटनेत महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक अद्यापही श्रीनगरमध्ये अडकले आहेत. राज्य सरकारकडून या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरू आहे. अकोल्यातील (Akola) एक जोडपेही सध्या काश्मिर फिरायला गेले असून दैव बलवत्तर म्हणूनच ते बचावले. कारण, ज्या दिवशी पहलगामा येथे हल्ला झाला, त्याच दिवशी ते तिथं जाणार होते. मात्र, थकवा आल्याने त्यांनी आपला पहलगामाचा दौरा एक दिवस आधीच उरकला अन् त्यांच्यावरील मोठं संकट टळल्याचे श्रीनगरमध्ये अडकलेले अकोल्याचे पर्यटक विशाल सांगोकार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
काश्मिरच्या पहलगाम येथील बैसरण पर्यटन स्थळावर काल अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून दैव बलवत्तर म्हणून अकोल्यातील विशाल सांगोकार आणि त्यांची पत्नी थोडक्यात बचावले. विशाल, त्यांची पत्नी आणि एक मित्र व त्याची पत्नी असे चौघेजण पहलगामला फिरायला गेले होते. काल घटना घडली त्या दिवशीच त्यांचं पहलगाम येथे फिरण्याचं बुकिंग होतं. मात्र, काही कारणामुळे त्यांनी आदल्या दिवशीच पहलगाम येथील सहल पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. कारण जेथे गोळीबार झाला तेथेच आदल्यादिवशी त्यांनी भेट दिली होतीय आणि व्हिडिओ देखील शूट केले होते. आता, ते व्हिडिओ आणि फोटो पाहावत नसल्याचे विशाल यांनी म्हटलं. सध्या विशाल आणि त्यांच्यासोबत असणारे इतर तिघेजण श्रीनगर येथे सुखरूप आहेत. लवकरच ते गावाकडे परतणार आहेय. विशाल हे अकोला जिल्ह्यातील सांगवी गावाचे रहिवासी आहेत. मात्र, बेलगाम येथे पर्यटकांसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचा त्यांनी म्हटलंय.
पहलगामला कुठलाही सुरक्षा यंत्रणा नाही
थकून आल्यामुळे एक दिवस आधी आम्ही तिथं स्टे घेऊन फिरुन आलो. आपण अनंतनाग क्रॉस करण्यासाठी 4-5 किमीचा ट्रेक आहे. पहलगाम बैसरण येथे कुठलीही सिक्युरिटी नाही, हे सरकारचं दुर्दैव आहे. तिथं सुरक्षा व्यवस्था नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे अकोल्याचे नागरिक आणि पहलगामला गेलेले पर्यटक विशाल सांगोकार यांनी सांगितले. आता, आम्हाला तेथील आमचे स्वत:चे पर्यटन केल्याचे फोटो सुद्धा पाहवत नाही, असेही त्यांनी म्हटले.
हिंदू-मुस्लिम माणुसकीचं दर्शन
पहलागामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरसह संपूर्ण देशभरामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारून, त्यांच्या कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येते. मात्र, दुसरीकडे काश्मिरमधील मुस्लिम बांधवांनीच पर्यटकांना आपली जाव धोक्यात घालून मदत केल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल
हेही वाचा
Video: काल मृतदेहासमोर सुन्न होऊन बसली, आज लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!
अधिक पाहा..