Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour: लवकरच महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही रेल्वे टूर सुरू करण्यात येत आहे. आयआरटीसीकडून भारत गौरव ट्रेनअंतर्गंत ही टूर सुरू होणार आहे. या टूरच्या माध्यमातून तुम्ही महाराजांचे गडकिल्ले, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊ शकणार आहेत. आयआरसीटीसीने पाच दिवसांच्या टूरची घोषणा केली आहे. 9 जून 2025 पासून ही टूर भारत गौरव पर्यटक ट्रेनअंतर्गंत आयोजित करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत प्रमुख ऐतिहासिक आणि अध्यात्मिक स्थळांना भेट देता येणार आहे. या टूरची किंमत किती आणि कोणती स्थळे पाहता येणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

 ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ ही टूर मुंबईतील सीएसएमटी येथून सुरू होईल आणि तिथूनच या टूरची सांगता होणार आहे. मात्र प्रवासी दादर, ठाणे येथेही बोर्डिंग करु शकणार आहात. आयआरटीसीकडून या टूरची सविस्तर माहिती समोर आली आहे.

या स्थळांना भेट देऊ शकणार

रायगड किल्लाः स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक स्थळ

पुण्यातील लाल महाल आणि कसबा गणपतीः छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्यात गेले. तर, कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता ग्रामदेवता आहे.

शिवनेरी किल्लाः शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला

प्रतापगड किल्लाः सातारा जिल्ह्यात हा किल्ला असून येथेच शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला

पन्हाळा किल्लाः हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. 

कोल्हापूरातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचादेखील या टूर पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

ही संपूर्ण यात्रा पाच दिवसांची असून सहाव्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. तर, प्रमुख स्थळांमध्ये मुंबई, रायगड, पुणे, शिवनेरी, भीमाशंकर, प्रतापगड, कोल्हापुर, पन्हाळा या शहरांचा समावेश आहे. 

या टूरमध्ये तीर्थक्षेत्रांचाही समावेश

भीमाशंकर येथे भगवान शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. 

कोल्हापूरः महालक्ष्मी मंदिराला पौराणिक महत्त्व असून स्थानिक अंबाबाईच्या रुपात पुजतात. 

टूरची किंमत किती?

ही टूर तीन श्रेणींमध्ये असणार आहे. 

इकोनॉमी (स्लीपर क्लास): 13,155 रुपये 
कम्फर्ट (3AC): 19,840 रुपये
सुपीरियर (2AC): 27,365 रुपये

पॅकेजच्या आधारेच AC/Non Ac हॉटेलमध्ये नागरिकांची सोय करण्यात येणार आहे. ऑनबॉर्ड आणि ऑफबोर्ड असताना शाकाहरी जेवण देण्यात येणार आहे.





Source link