Eknath Shinde : महायुतीनं लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली, या योजनेच्या विरोधात अनेकजण न्यायालयात गेले होते. पण आज मी सांगतो की लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नसल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. फिल्मी डायलॉग आहे न एक बार मैने कमेटमेंट कर दी तो मै किसीकी भी नही सूनता असे एकनाथ शिंदे म्हणाले.
प्रिती बंड यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
एकनाथ शिंदे हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. तिथे आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रिती बंड यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेली प्रथमच इतके मंत्री अमरावतीत आलेत. या महाराष्ट्र्र 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं. जर आले नाहीतर गावात जाऊन शेती करणार असल्याचे म्हणालो होतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
मी विचारांशी कधीही तडजोड केली नाही
प्रिती ताई आपण स्वगृही आलात, तुमच्या पाठीशी हा तुमचा भाऊ उभा आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. संजय बंड यांनी रक्ताचं पाणी करुन शिवसेना वाढवली पण आता ते बघा काय समजतात. या आमच्या शिवसेनेत कोणीच नेता नाही. शिवसेना अजून आपल्याला वाढवायची आहे. मेहनत केल्यानंतर काय होते ते बघा असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मी शेतात गेलो की, काहीजण म्हणतात बघा गेला, नाराज झाला, मी मजा घेत असतो असेही ते म्हणाले. पण काहीजण तर विदेशात जातात असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मी विचाराशी कधीही तडजोड केली नाही. म्हणून जी पद आहे ती लोकांच्या सेवेत देतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मॉक ड्रिल करु करु म्हणत तिकडे बॉम्ब सोडले
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईट का जवाब पत्थर से दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तेव्हाचे राज्यकर्ते हल्ला झाला की कोणीच बोलत नव्हते. पण आता घुसके मारने वाले राज्यकर्ते असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मॉक ड्रिल करु करु म्हणत तिकडे बॉम्ब सोडल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी भारतीय जवानांचा आणि पंतप्रधान यांचं अभिनंदन करतो असे शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Nana Patekar : एकनाथ शिंदे असे मित्र, ज्यांच्यावर एकही डाग नाही; नाना पाटेकरांकडून शिंदेंचे तोंड भरून कौतुक
अधिक पाहा..