Beed News : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात… यापैकी 78 हजार महिला मजूर आहेत… त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.
बीडमध्ये 843 ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्य ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला. मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागलं. पण जेव्हा मी सत्य तपासलं, तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या. आपण याबद्दल थोडंस जाणून घेऊया… ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी 2019 पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवले आहेत. आता उठसूठ कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच. जर कोणत्या महिलेला गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची पुर्वपरवानगी घेवुनच तपासणी करून मग गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते अस चित्रा वाघ यांनी सांगितले.
या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे, वेगवेगळ्या वर्षांत झाल्या आहेत. 2019 पासून तर महिलेला वैद्यकीय गरज असली तर बिड शल्य चिकित्सकाच्या अधिकृत परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही.
यापैकी 267 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 ते ऑक्टबर 2024 या कालावधीत बिडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये महिलेला तशी वैद्यकीय गरज असल्यास तपासणीनंतर शल्य चिकित्सकाच्या पूर्वपरवानगीनेच झालेल्या आहेत. उर्वरित 576 महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही 2019 पुर्वीच झालेल्या आहेत. त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे: महिला आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहानिशा करा. गैरसमज आणि भीती पसरवू नका असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
काय आहे नेमकं प्रकरण
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी बीडची ओखळ. या जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. यापैकी 78 हजार महिला मजूर आहेत. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच, 1 हजार 523 महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे आता याचा अहवाल तयार झाला आहे. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे.