अमरावती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे महायुतीमध्ये इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेमंडळी पक्ष सोडून जाताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असून लोकसभा उमेदवाराने साथ सोडल्यानंतर आता विधानसभा उमेदवारानेही ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. उद्धव ठाकरे यांना अमरावतीत पुन्हा एकदा राजकीय धक्का देण्यात आली असून शिवसेना उबाठाला अमरावतीत (Amravati) मोठी खिंडार पडली आहे. शिवसेना (Shivsena) माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सुनील खराटे यांनी मविआची साथ सोडत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. विधानसभा निवडणुकीत दारुन पराभव झाल्यानंतर सुनील खराटे यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतलं. खराटे यांच्या भाजप प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शेकडो कार्यकर्त्यांसह खराटे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसू शकतो. 

खराटेंना विधानसभेला केवळ 7121 मतं

दरम्यान, बडनेरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रवी राणा हे मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात प्रीती बंड आणि शिवसेना महाविकास आघाडीचे सुनील खराटे यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, प्रीती बंड यांना 60,836 मतं मिळाली तर सुनील खराटे यांना केवळ 7121 मतं मिळाली आहेत. त्याच, खराटे यांनी आज भाजपात प्रवेश केला. 

चंद्रहार पाटलांचाही शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या आणि निवडणुकांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. क्रीडा क्षेत्रातील काही प्रश्न आणि खेळाडूंच्या मागण्यांसाठी आपण सरकारसोबत जात असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं. 

हेही वाचा

पेरण्यांची घाई नको, 15 जून नंतरच मोसमी पाऊस; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

आणखी वाचा



Source link