Amravati News : अमरावती (Amravati ) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुलरचा शॉक (cooler shocked) लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे आज सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना विद्युत शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
सरमसपुरा पोलीस घटनास्थळी रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, पती कामावरून आल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. तोपर्यंत याबाबत कोणालाच काही माहिती नव्हते. या घटनेनंतर सरमसपुरा पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. सुमती लक्ष्मण कासदेकर (वय 35) श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय 4) आणि विकी लक्ष्मण कासदेकर (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. दुसऱ्या खोलीत असलेली चार मुलं ही बचावली आहेत. लक्ष्मण कासदेकर यांना एकूण सहा अपत्य होती. दरम्यान, एकाचवेळी आईचा आपल्या दोन चिमकल्यांसह मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलरमध्ये पाणी टाकताना ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.
जालन्यामध्येही गेल्या आठवड्यात घडली होती अशीच घटना
जालना जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली असून विजेचा धक्का लागल्याने बाप आणि दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत विनोद मस्के आणि त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांना तिघांनाही तात्काळ जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे वरुड गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातही शॉक लागून बाप लेकांचा मृत्यू झाला होता
बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बाप लेकाला विद्युत तारेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. या विद्युत तारेच्या जबर धक्क्यामध्ये पिता पुत्राचा मृत्यू झालाय. अभिमान कबले आणि ज्ञानेश्वर कबले असे या दोघा बापलेकाचे नाव आहे. हे दोघेजण आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी विद्युत तार खाली पडलेली होती. यात प्रवाह असल्याने दोघांनाही त्याचा शॉक लागला. ही घटना घडल्यानंतर त्या दोघांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
ह्रदयद्रावक… वीजेचा शॉक लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत; गावावर शोककळा
आणखी वाचा