Kolhapur Crime News : पुरोगामी, प्रगत कोल्हापुरात जादुटोण्याचा भयंकर प्रकार घडला. रात्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच असाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा करण्यात आली. .या अघोरी प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि पुरुषाकडून भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार सुरू आहेत. हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र, अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केला होता. यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलं. मात्र, पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम आलेचे दिसून आले. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत.त्रीच्या अंधारात पंचगंगा घाटावर मांत्रिकाकडून पिडीत महिलेला झपाटलेला भूत काढण्याचा विधी केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.