Akola Crime News : अकोला शहरातील रमाबाई नगर (Ramabai Nagar) परिसरात एका धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश पंचू जोसेफ (वय अंदाजे 35) या युवकाची त्याच्या जवळच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पवन विलास मोरे उर्फ ‘टकल्या’ (रा. अकोला) असे आरोपीचे नाव असून, तो सध्या फरार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Akola Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि पवन हे दोघेही चांगले मित्र होते. मंगळवारी रात्री ते रमाबाई नगर चौकात एकत्र दारू पीत होते. दरम्यान, त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यातूनच पवन उर्फ ‘टकल्या’ने अचानक रागाच्या भरात प्रकाशवर दगडाने वार केले. या हल्ल्यात प्रकाश गंभीर जखमी झाला.

आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु

स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रकाशला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर पवन मोरे हा घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. 

दोन दिवसांत दुसरे हत्याकांड

दरम्यान, अकोल्यात गेल्या दोन दिवसांत हे दुसरे हत्याकांड असून, याआधी अकोट फैल भागात एका व्यक्तीची हत्या झाली होती, तर घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. विशेष म्हणजे, त्या घटनेमागेही किरकोळ वादच कारणीभूत ठरला होता. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्याजाच्या पैशातून तरुणाचे अपहरण

दरम्यान, बीडच्या धारूरमध्ये उसने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे व्याजासह 80 हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी एका तरुणाचे चौघा जणांनी अपहरण केले. तसेच त्या मुलाच्या घरी फोन करत मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताच्या आता पन्नास हजार रुपये टाका, नाहीतर तो तुम्हाला दिसणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आणखी वाचा

Bhandara Accident News: भंडाऱ्याच्या महामार्गावरील उड्डाणपुलावर होंडा सिटीनं दुचाकीस्वारांना चिरडलं;पती-पत्नीसह दोन चिमुकले गंभीर

आणखी वाचा



Source link