Bacchu Kadu : एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही? असा सवाल करत ही छुपी आणीबाणीच असल्याचे मत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले. ती आणीबीणीची फिजीकली तारीख होती, तुमची छुपी आणीबाणी असल्याचे कडू म्हणाले. ते आमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आणीबाणीचं (Emergency)  समर्थन आम्ही करत नाही. पण ज्यांनी आणीबीणीवर लेख लिहला त्यांना मला सांगायचं आहे की, सौ चुहे खाके बिल्ली हजको जाती है तो ये गलत है असे म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत

भाजपला आणीबाणीवर बोलायचा कोणताही अधिकार नाही. तो त्यांनी गमावला आहे. भाजपची आणीबाणी छुपी आहे, ती निषेधार्ह असल्याचे कडू म्हणाले. तसेच एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही? असा सवाल करत कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपमध्ये एकही भ्रष्टाचारी नाही का सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का असेही कडू म्हणाले. 

4 हजाराचं ताट आमदार आणि खासदार समोर मांडताना बजेट दिसत नाही का? 

विधवा महिलांना पैसे नाही, दिव्यांगाने पगार नाही, एमआरजीचे पैसे नाहीत, कर्जमाफी म्हणताना तिजोरी दाखवता असेही कडू म्हणाले. पण 4 हजाराचं ताट आमदार आणि खासदार समोर मांडताना तेव्हा तुम्हाला बजेटचा आकडा दिसत नाही का? असा सवाल देखील बच्चू कडू यांनी केला. भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळीवर ताव मारणारी माणसं ही प्रवृत्ती रावणाची प्रवृत्ती आहे. एकीकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे. रोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आणि आमचे आमदार खासदार तांब्याच्या आणि चांदीच्या ताटात चार चार हजाराचं जेवण  खातात असे कडू म्हणाले. सत्ताधाऱ्यांना मतदाराचे भय राहले नाही का? पाच वर्षे नंगानाच केला तरी वेळेवर धर्मावर मत मिळते ही मानसिकता असल्याची टीका बच्चू कडू यांनी अमरावतीत केली. कृषिमंत्र्यावरच 13 कोटी रुपये कर्ज आहे त्यांचीच मूळ त्यांची बँक तोट्यात आहे. कोकाटेंनी शेतकऱ्यांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये. त्यांनी कर्जमाफीसाठी भांडले पाहिजे नाहीतर आम्हाला पुन्हा तुम्हाला घेराव लागेल असा इशाराही कडू यांनी दिला. तसेच कोकाटे हे कर्जमाफीत बसणार नाहीत ते अपात्र आहेत असेही कडू म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

देशात ‘शैक्षणिक आणीबाणी’, एक परीक्षा नीट घेता येईना; घोळावरुन ठाकरे, पाटील, चतुर्वेदींचा संताप

आणखी वाचा



Source link