Sandipanrao Bhumre Liquor License Row : शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे…भुमरेंची भावजय आणि पीएच्या देशी दारू दुकानांच्या परवान्यांवरून गंभीर आरोप करण्यात करण्यात आलेत. या देशी दारू दुकानांना एकाच दिवसात परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुमरेंच्या दारू दुकांना वायूवेगानं परवानगी कशी मिळते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
छाया भुमरे यांनी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर स्वयंघोषणापत्र सादर केले. त्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी छाया भुमरे यांच्या परवान्याबाबत घेतलेला ठराव वैध आहे का, याची विचारणा करणारे पत्र गंगापूर गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी त्याच दिवशी हा अर्ज वैध असल्याचं टपालानं कळवलं. या अर्जावर अतिशय झटपट म्हणजे दुसऱ्या दिवशी रोजी राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षकांनी समक्ष जबाब घेतल्याची स्वाक्षरी केली. विशेष म्हणजे त्याच्या आठ दिवसांपूर्वीच छाया भुमरे यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतल्या ओशिवरा व्हिलेजमधील डिसोझा बारचा नूतनीकरण केलेला परवाना स्थलांतर करण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या आठ दिवसांत त्यांना परवाना मिळाला.
दारुच्या दुकानासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागली. 13 ऑक्टोबर 2023रोजी छाया भुमरेंचा देशी दारुच्या किरकोळ दुकानासाठी ठराव पांढर ओहळ ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर. 8 डिसेंबर 2023 रोजी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर घोषणापत्र सादर झाले. 8 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क अधिका-यांकडून परवान्याबाबतचा ठराव वैध आहे का याची विचारणा झाली. 8 डिसेंबर गटविकास अधिका-यांकडून टपाली अर्ज वैध ठरवण्यात आला. 9 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क उपाध्यक्षांची समक्ष जबाबावर स्वाक्षरी झाली.
भुमरेंच्या दारू दुकानांना वायुवेगानं परवानगी मिळाल्यावरून आमदार रोहित पवारांनी निशाणा साधला. सर्वसामान्य लोकांसाठी यंत्रणा इतक्या वेगानं काम करणार का, असा सवाल पवारांनी केलाय. इतरांना दारू दुकानाच्या परवान्यांसाठी वर्षभर खेटे मारावे लागतात. मात्र भुमरेंना एका दिवसात परवाने देण्याची कृपा कशी झाली असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.
दारू दुकानांना अवैधपणे एका दिवसात मान्यता देण्यात आली. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. दारू परवान्यांवरून विरोधकांनी संदीपान भुमरेंना कोंडीत पकडलंय. येत्या काळात यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे..या प्रकरणात भुमरे आता काय स्पष्टीकरण देणार, याकडे लक्ष लागलंय.