अकोला : अकोल्यातील कृषीनगर भागात दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या या राड्यामध्ये गोळीबारासह तलवारी आणि पाईपचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण वादात दोन्ही गटातील जवळपास 8 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान राडा
अकोल्यातील कृषी नगरात दोन गटात वाद झाला आहे. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान राडा झालाय. तलवारीसह बंदुकीचा या वादा दरम्यान वापर झालाय. या वादादरम्यान दोन गट आमने-सामने भिडलेत. या संपूर्ण वादात दोन्ही गटांतील जवळपास 8 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटना स्थळावर गोळीबार झाला आहे तर घटनास्थळावर 2 जिवंत काडतूसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. तर एक गोळी हवेत फायर झाली आहे.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
जखमींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज रात्री सात वाजता सुमारास आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता. हा वाद इतका भयंकर होता की परिसरातील नागरिक आणि कृषी नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. दोन्ही गट वंचितच्या कार्यकर्त्यांचे आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह, श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान, या वादानंतर काहीजण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलीस सर्वांचे ओळख पटवण्याचे काम करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्चस्वाच्या लढाईतून आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात तुफान राडा झाल्याचती माहिती मिळाली आहे. या राड्यात तलवारीसह बंदुकीचा देखील वापर करण्यात आला आहे. त्यामुळं अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे. घटना स्थळावर गोळीबार झाला आहे तर घटनास्थळावर 2 जिवंत काडतूसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस प्रशासन लगेच घटनास्थळी दाखल झाले होते.
महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhajinagar: समृद्धी’च्या टोलनाक्यावर झटापट अन् गोळीबार; कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली गोळी, कर्मचारी घटनेनंतर झाला फरार
आणखी वाचा