कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या हिंजवडी दौऱ्या दरम्यान अधिकारी सरपंच यांना चांगलेच झापले… पण अधिकारी आणि छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांवर राग काढणारे अजित पवार त्यांच्या पक्षातील चुका करणाऱ्या आमदारांवर का चिडत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड बोलण्यासाठी कायम चर्चेत राहिले आहेत.आजही अजित पवार यांचा परखडपणा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अनुभवला.अजित पवार यांनी आज हिंजवडीचा भर पावसात सकाळी सहा पासून पाहणी दौरा सुरू केला.दौरा सुरू होताच अजित दादांची वक्रदृष्टी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्यावर पडली. जांभूळकर यांनी अजित पवार यांच्याकडे विकास कामात मंदिर जात असल्याची तक्रार केली. त्यावर अजित पवार चांगलेच भडकले. त्यांनी थेट सरपंचांना खडे बोल सुनावले….!

अजित दादांचे सरपंचांना काय म्हणाले?

अजित पवारांनी सरपंचाला सुनावल. ‘अहो असू द्या हो असू द्या हो साहेब,धरण करताना मंदिर जातातच की नाही….तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क चाललं.माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर.काय तुम्हाला पडलं नाही..बेंगलोरला हैदराबादला.कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत.हे केल्याशिवाय गत्यंतर नाही.ए कॅमेरा बंद कर.’

सरपंचाला बोलल्यानंतर अजित पवार यांनी पाहणी दरम्यान नाल्यावर बांधकाम करणाऱ्या एका विकासालाही झापले….! हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ती अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते. बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती. हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच ‘तुमच्यामुळे बस पाण्यात गेला तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची..’ असे अजित दादा म्हणाले. 

तिसऱ्या घटनेत अधिकाऱ्यांना बोलताना स्वतःचा दाखला देत त्यांनी ‘रस्ता अडवणाऱ्यांवर 357 चा गुन्हा दाखल करा’, अस सुनावले…

अजित पवारमध्ये आला तरी 353 टाका…!

-कोणालाही मध्ये येऊ देऊ नका,कोणतीही आडवा आडवी करू नका ,कोणी आडवा आल तर समजून सांगणार,एकदाच कामच करून टाकायचे, असे अजित पवार म्हणाले. एकीकडे अजित पवार अधिकारी सरपंच यांना झापताना दिसत आहेत.मात्र पक्षातील आमदाराना ते झापताना का दिसत नाहीत? असा सवाल उपास्थित केला जात आहे. सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते टाकणाऱ्या विजयकुमार घाडगेस मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण याला, तर विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना मात्र ते बोलताना दिसत नाहीत.तर भावाच्या गोळीबार प्रकरणी चर्चेत असलेले भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्यावर ही ते रागावले असल्याचे चित्र नाही…! वाल्मीक कराडच्या संबंधामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे हे तर त्यांच्या गळ्यातील अजून ही ताईत आहेत. त्यामुळे अजित पवार यांना राग फक्त काही मोजक्या लोकांवर येतो का असा प्रश्न उपस्थित झालाय…!





Source link