माजी मंत्री धनंजय मुंडे आपल्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा त्यांच मंत्रीपद जाणं असो. याकाळात धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तितक्याच महत्त्वाच्या होत्या.  पण या सगळ्यात जेव्हा धनंजय मुंडेंमधला बाप व्यक्त होतो तेव्हा… 

धनंजय मुंडे यांनी आपली दुसरी कन्या जान्हवी मुंडे हिच्या यशाबद्दल एक अभिमानास्पद पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जान्हवी मुंडेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती दिली आहे. तसेच जान्हवी आता कोणती जबाबदारी सांभाळत आहे. तसेच परदेशात राहूनही बाप म्हणून मला तिच्या मेहनतीचा, संवेदनशीलतेचा आणि प्रगतीचा खूप अभिमान वाटतो, अशी भावना यामध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. 

काय आहे पोस्टमध्ये 

माझी कन्या जान्हवीचा मनापासून अभिमान वाटतो!

जान्हवी सध्या Wesleyan University, USA मध्ये  Government आणि Literature या दोन विषयांमध्ये पदवी घेत आहे. मानवी हक्कांसाठी अभ्यास करणं हे तिचं खास क्षेत्र आहे.

कॉलेजच्या वृत्तपत्रात ती आधी फोटो आणि विशेष लेख विभागाची प्रमुख होती, आता ती संपूर्ण वृत्तपत्राची मुख्य संपादक झाली आहे!

CT Mirror या अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तसंस्थेत ती सध्या पत्रकार म्हणून काम करते आणि तिथे समाज, सरकार आणि लोकांच्या प्रश्नांवर ती संवेदनशीलपणे लिखाण करते.

शिक्षणासोबतच ती सोशल मिडिया आणि जेलमध्ये शिक्षण देणाऱ्या संस्थेत संशोधन करत आहे.

बाप म्हणून मला तिच्या मेहनतीचा, संवेदनशीलतेचा आणि प्रगतीचा खूप अभिमान वाटतो.

ती जे काही करतेय, ते केवळ यशासाठी नाही, तर समाजासाठी आहे आणि हेच तिचं खऱ्या अर्थानं मोठेपण आहे!

Proud of you Janhavi! 

धनंजय मुंडे यांची खास पोस्ट 

धनंजय मुंडे यांना वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आदीश्री मुंडे अशा तीन मुली आहेत. वैष्णवी मुंडे ही माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सर्वात मोठी मुलगी वैष्णवी मुंडे आहे. दुसरी मुलगी जान्हवी असून त्यांच्या धाकट्या मुलीचे नाव अधीश्री आहे. वैष्णवीने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. वैष्णवी मुंबईतील एका नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहे.





Source link