Bacchu Kadu on Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काल (3 ऑगस्ट) मोर्शी याठिकाणी कर्जमाफी वरून बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर अप्रत्यक्षपणे सडकून टिका केली. यावेळी बावनकुळे म्हणाले की, कर्जमाफी वरून आंदोलन करायचं आणि नाटकं करायचे, पण हे लक्षात ठेवा दिव्यांगांना 1500 वरून 2500 रुपये मानधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, त्यांनाच ती मिळणार. पण काही लोकं याठिकाणी नौटंकी करत आहे. असा अप्रत्यक्ष टोला बावनकुळे यांनी लगावला.
दरम्यान याच मुद्यावरून बच्चू कडू यांनी प्रहार करत बावनकुळेंच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांच्या वेदना बावनकुळेंना कळत नाही. ते मंत्री झाल्यामुळे त्यांचे पोट भरलं असेल. सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पत्नींचा आक्रोश आहे. त्यांचा आक्रोश रस्त्यावर येत असेल आणि तुम्ही जर त्याला नौटंकी म्हणत असाल तर हा अपमान आहे. अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. शेतकऱ्यांना शिव्या देणे बावनकुळे यांनी बंद केले पाहिजे. तुम्ही पैसे दिले म्हणजे स्वतःच्या घरातून दिले नाही, त्यासाठी मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का? अशी बोचरी टीका हि बच्चू कडू यांनी केली आहे.
शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण, तुम्हाला लाज वाटते का? – बच्चू कडू
आमचे पैसे आहे, आमचा अधिकार आहे. हे टोमणे मारणे बंद करा. आम्हाला देखील बोलता येतं, तुमच्यापेक्षा वाईट बोलता येतं, हे विसरू नका. काल शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण दिलं, तुम्हाला लाज वाटते का? पैसा सरकारचा आणि भाषण राजकीय. बोलायचं असेल तर स्वतःची राजकीय सभा घ्या, पैसे खर्च करा. शासकीय कार्यक्रमाचे राजकीय भाषण करत असाल तर तुमच्या सारखे महामूर्ख आहे. का आम्ही यावर तक्रार करू. एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात तिथल्या स्थानिक आमदार यांना बोलू दिले नाही. संत्रा बद्दल बोलायला तयार नाही. रामदेव बाबांना कारखाना सुरू केला, काय भाव घेणार आहे जाहीर करा ना. असेही बच्चू कडू म्हणाले.
धर्माच्या नावाखाली सुरू असलेली तुमची गुंडागर्दी बंद होणार- बच्चू कडू
मुख्यमंत्र्यांनी एखादा राजकीय पॅकेज जाहीर करतील, असं वाटलं होतं. पण त्यांनी राजकीय भाषण केलं. धर्माच्या नावाखाली सुरू असलेली तुमची गुंडागर्दी हे बंद होणार. आमची नौटंकी काढल्यापेक्षा तुम्ही काय सातबारा कोराची नवटंकी तुम्ही केली होती. आमचे पैसे आहे, आमचा अधिकार आहे, हे टोमणे मारणे बंद करा. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी वरची कर्जमाफीची उपाययोजना जाहीर करावी. जेव्हा सभेत बोलले तेव्हा असं म्हटलं का की दोन वेळा कर्जमाफी करता येणार नाही. बोलताना अभ्यास करून बोलले नव्हते का? असा सवाल हि बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा