अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाच्या नाश्त्यासाठी 
आणलेल्या कांदेपोह्यामध्ये चक्क मृत पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. दरम्यान, मृत पाल आढळल्याचा हा मुद्दा आता अकोल्यात चांगलाच चर्चेत आला आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या क्रमांक 32 वॉर्डमधील दाखल असलेल्या शेख सोहेल या रुग्णाच्या कांदेपोह्याच्या नाश्त्यात हे पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. त्यांनी नाश्त्याच्या पोह्याची प्लेट रुग्णालय बाहेरील ‘अग्रवाल’ नावाच्या रेस्टॉरंटमधून आणली होती, त्यामध्ये हे पालीचं मुंडकं आढळल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला अर्थातच सोहेल’ला मळमळ आणि उलटी झाली होती.

अद्यापपर्यंत रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई नाही

दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवला आहे. मात्र, अद्यापपर्यंत रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई झाली नाही. एकंदरीत या घटनेमुळे आता अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाबाहेर अर्थातच उघड्यावर देण्यात येणारा नास्ता आता रुग्णासह नातेवाईकांच्या जीवावर उठलाय का?, असाच सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळं नागरिकांनी बाहेर उघड्यावर काही खात असाल तर सतर्कता बाळगावी, अन्न अथवा जे काही बाहेरून खाण्यासाठी घ्याल तपासूनच खावे, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलं आहे. तर सदर व्यक्तीने आपल्याकडून पोहे खरेदी केल्याचा आरोप अग्रवाल रेस्टॉरंटनं फेटाळला आहे.

रुग्णाला मळमळ आणि उलटी झाली

शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या क्रमांक 32 वॉर्डमधील दाखल असलेल्या शेख सोहेल या रुग्णाच्या कांदेपोह्याच्या नाश्त्यात हे पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. त्यांनी नाश्त्याच्या पोह्याची प्लेट रुग्णालय बाहेरील ‘अग्रवाल’ नावाच्या रेस्टॉरंटमधून आणली होती, त्यामध्ये हे पालीचं मुंडकं आढळल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला अर्थातच सोहेल’ला मळमळ आणि उलटी झाली होती. या घटनेनंतर त्या रेस्टॉरंटवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तर सदर व्यक्तीने आपल्याकडून पोहे खरेदी केल्याचा आरोप अग्रवाल रेस्टॉरंटनं फेटाळला आहे.

आणखी वाचा



Source link

YouTube
Instagram
WhatsApp