Crime News JCB Connection Revealed Suspense: वर्ध्याच्या हिंगणघाट येथे नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह जमिनीत पुरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. नवरा बायकोत होणाऱ्या नेहमीच्या वादामुळे नवऱ्याने चार दिवसांपूर्वी बायकोची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्याचं उघड झालं. पत्नीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरल्यावर स्वतःच हिंगणघाट पोलिसात बायको हरवली असल्याची तक्रार देखील या व्यक्तीने दाखल केली होती. हिंगणघाट पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र हादरवून टाकणारा खुलासा झाला. पतीनेच पत्नीची हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच हिंगणघाट शहरात खळबळ उडाली आहे.
नेमका कुठे घडला हा प्रकार?
हिंगणघाट येथील इंदिरा वार्ड परिसरात 20 दिवसापूर्वी रहायला आलेल्या सुभाष लक्ष्मन वैद्य याने 19 ऑगस्ट रोजी बायको हरविली असल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून शोध सुरू केला. सर्वत्र तपास करीत असताना पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना वैद्य योग्य उत्तरे देत नसल्याने पोलिसांना संशय आला. तर मृतक पत्नी माधुरीच्या नातेवाईकांनी नवऱ्यावर संशय घेतला असल्याने पोलिसांनी तपास केला.
त्या खड्ड्याबद्दल पोलिसांनी संशय
काही दिवसांपूर्वी सुभाषने घराजवळ जेसीबीच्या साहाय्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी खोल खड्डा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नेमका इतका खोल खड्डा कशासाठी खोदण्यात आला? आणि खड्डा बुजला कसा? याची चौकशी सुरू केली. ज्या जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करण्यात आला. त्या जेसीबी मालकाला हुडकून काढण्यात आले. जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदला आणि तो पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदून मागितल्याचे सांगितले. पण खड्डा का व कुणी बुजवला हे मात्र माहिती नसल्याचे सांगितले.
आरोपी फरार
पोलिसांनी फॉरेन्सिक चमू व डॉग स्कॉडच्या माध्यमातून खड्ड्याच्या आजूबाजूला शोध घेण्यात आला. खड्डा पुन्हा खोदल्यावर त्यामध्ये प्रेत आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतले असून आरोपी सुभाष मात्र पसार झाला आहे.
FAQ
हिंगणघाट येथील हत्या प्रकरणात काय घडले?
उत्तर: हिंगणघाट येथील इंदिरा वार्ड परिसरात सुभाष लक्ष्मन वैद्य याने आपल्या पत्नी माधुरीची धारदार शस्त्राने हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरला. यानंतर त्याने पत्नी हरवल्याची खोटी तक्रार हिंगणघाट पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिस तपासात हत्या आणि मृतदेह पुरल्याचा खुलासा झाला.
ही घटना नेमकी कुठे घडली?
उत्तर: ही घटना हिंगणघाट शहरातील इंदिरा वार्ड परिसरात घडली, जिथे सुभाष लक्ष्मन वैद्य आणि त्याची पत्नी माधुरी 20 दिवसांपूर्वी राहायला आले होते.
सुभाषने पत्नीच्या हत्येनंतर काय केले?
उत्तर: सुभाषने पत्नी माधुरीची हत्या करून तिचा मृतदेह घराजवळ खोदलेल्या खड्ड्यात पुरला. त्यानंतर त्याने 19 ऑगस्ट रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली.
पोलिसांना सुभाषवर संशय कसा आला?
उत्तर: पोलिसांनी तक्रारीनंतर तपास सुरू केला, पण सुभाषने विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली नाहीत. तसेच, माधुरीच्या नातेवाईकांनी सुभाषवर संशय व्यक्त केला, ज्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.