CM Upset On PWD Officers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.केंद्राचा निधी मार्च पूर्वी वापरायला हवा.जेव्हा पंतप्रधान स्वतः आढावा घेतात.तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदे आम्हाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकल्पाची कामे लवकर पूर्ण करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. अशा प्रकारचा अपहार जर नगरविकास मंत्री करत असेल याचा अर्थ केंद्र व राज्य यांचे भ्रष्टाचारात संगनमत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या नगरविकासाबाबत जनतेला विश्वासात घेऊन नगर विकास खात्यात कसा भ्रष्टाचार झालेला आहे हे त्यांनी सांगायला हवे, असे राऊत म्हणाले. पन्नास वर्षांपूर्वीचा भ्रष्टाचार काढतात असे मुख्यमंत्र्यांना वाटते मात्र तुमच्या नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगर विकास मंत्रीला बडतर्फ करा आणि महाराष्ट्र समोर नवा पायंडा पाडा, असेही ते पुढे म्हणाले.
तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनदेखील यावर प्रतिक्रिया आली आहे. मुख्यमंत्र्यांनी एका विभागावर नाराजी व्यक्त केली. त्याच स्वगत पण त्याच करणार काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. तसेच संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी नगरविकासच्या अधिकाऱ्यांना झापणं आणि त्यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची टीका या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याबाबतच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगितले. त्यांनी या आरोपांचे खंडन करताना स्पष्ट केले की, खात्याविषयी पसरवले जाणारे दावे तथ्यहीन आहेत. त्यांनी सरकारच्या एकजुटीवर भर देत या बातम्या निराधार असल्याचे ठासून सांगितले.
FAQ
प्रश्न: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी का व्यक्त केली?
उत्तर: मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचा निधी मार्चपूर्वी वापरण्याबाबत नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रकल्पांचा आढावा घेतात, त्यामुळे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण करण्याचे आणि केंद्राचा निधी वेळेवर वापरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रश्न: संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना अपयशी ठरवले आणि त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, नगरविकास खात्यात भ्रष्टाचार सुरू असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगावे आणि शिंदे यांना हटवावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, नाराजी व्यक्त केल्यानंतर कारवाई करावी, अन्यथा ती केवळ स्वगत राहील.
प्रश्न: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बातम्यांवर काय म्हटले?
उत्तर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याबाबतच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे सांगितले. त्यांनी या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, नगरविकास विभागातील घडामोडींबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या तथ्यहीन आहेत आणि त्यांचे खंडन केले.