Manoj Jarange On Dhananjay Munde : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मनोज जरांगे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी लॉरेन्श बिश्नोई गँगकडून त्यांच्या जीविताला धोका असल्याचा दावा करण्यात येत होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांनी आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला सांगतो शांततेने घ्या. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार. मनोज जरांगे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए आहे. त्याने या आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेलं .तिथे पकडलेल्या एका पैकी माझ्याकडे भरपूर आहे असं सांगत दोन कोटी त्यांना द्यायचे ठरले. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे या आरोपींची एक तास वाट पाहत राहिले. आरोपींना गोळ्या पुरवण्याचं आश्वासन दिलं. यात खूप जण आहे अंतरवालीच्या परिसरातील बडे नावाची व्यक्ती देखील आहे यात एकूण 10 ते 11 जण आहेत. ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटलांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं समोर आलंय.याप्रकरणी राजकीय वर्तुलळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.. हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी असं मत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलंय. तर मनोज जरांगे हे समाजासाठी लढणारे नेते म्हणून उदयास आले आहेत.. मतभेद असून शकतात..मात्र विचारांची लढाई विचारांनी लढावी, असं वडेट्टीवार म्हणालेत.
FAQ
1 मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट कसा उघडकीस आला?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून, या प्रकरणी जालना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचा दावा होता. आता मनोज जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेत हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
2 मनोज जरांगे पाटील यांनी कोणते आरोप केले आहेत?
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए असून, त्याने आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेले. तिथे आरोपींना २ कोटी रुपये देण्याचे ठरले. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे आरोपींची एक तास वाट पाहत राहिले आणि गोळ्या पुरवण्याचे आश्वासन दिले. यात अंतरवाली परिसरातील बडे नावाच्या व्यक्तीसह एकूण १० ते ११ जणांचा समावेश आहे. मुंडे यांनी जरांगे यांना मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा आणि वाहनाला धडक देण्याची योजना असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
3 मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काय सांगितले?मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेने घ्या असे सांगितले. “तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार,” असे ते म्हणाले. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि समाजाला धीर दिला.