राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील कोरेगाव येथे जमीन व्यवहार झाला. या व्यवहाराचा भांडाफोड ‘झी 24 तास’ ने केल्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रासह सगळीकडे गाजली. यानंतर आज अखेर अजित पवारांनी हा जमिनीचा व्यवहार रद्द झाल्याच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. यानंतर या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी या अजित पवारांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

चोरी केलेला माल रिकव्हर केला तर…

चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का?’असा थेट सवाल अंबादास दानवेंनी अजित पवारांना विचारला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे का नाही? कंपनीवर गुन्हा दाखल करावा. 300 कोटी कुठून आले…सरकारी जमीन विकली गेली आहे. 

तसेच पुढे ते म्हणाले की, हे उघड झाले नसते तर पचवले असते ना… राज्य सरकार बनवाबनवी करत आहे. अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज आहे, अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली आहे. 

या प्रकरणाची ईडीने चौकशी करायला हवी. कारण अशाच प्रकरणत खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता, मग अजित पवारांना वेगळा न्याय का?महसूल मंत्री अजित पवारांना वाचवत आहे? असा सवालही विचारण्यात आला आहे. 

हाच नियम सर्वांना लावावा, कोरेगाव पार्कातील ४० एकर जमीन दिली जाते व एकही पैसा दिला जात नाही..आणखी मोठे आश्चर्य आहे. अजितदादा फक्त गोष्टी करतात. आता घाला टायरमध्ये एकेकाला…एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मुलाला सांभाळले पाहिजे. अजितदादांना माहिती नाही असं कसं होवू शकते. भ्रष्टाचाराचे बरबटलेले हे सरकार आहे. अजित पवारांना क्लिनचीट देणे हे पाप ठरेल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. 

अंबादास दानवेंनी काय म्हटलं आहे?

मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही. आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? असं आश्चर्य अंबादास दानवे यांनी पोस्टमधून व्यक्त केलं आहे. बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे. खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे असंही ते म्हणाले आहेत. 





Source link