Balasaheb Thackeray And Sharad Pawar Relation : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेते शरद पवार यांची मैत्री जगजाहीर आहे. यांचे नाते मात्र, मैत्रीपलिकडचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई आहे. शरद पवारांचा जावई हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उद्योगपती देखील आहे. यांचे नाव जाणून तुम्ही शॉक व्हाल. बाळासाहेब ठाकरे यांचा भाचा आहे शरद पवारांचा जावई कसा झाला. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे सोयरीक कसे जुळले जाणून घेऊया.
सदानंद भालचंद्र सुळे…. यांच्या नावाची फारशी चर्चा होत नाही. मात्र, सुप्रिया सदानंद सुळे म्हंटले की सदानंद सुळे हे नाव देखील चर्चेत येते. सदानंद सुळे महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती आहेत. सदानंद सुळे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे पती आहेत. बाळासाहेब ठाकरे हे सदानंद सुळे यांचे मामा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची बहिण सुधा सुळे यांचे सदानंद हे सुपूत्र आहेत.
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची ओळख कशी झाली?
सुप्रिया सुळे यांचं 12 वी पर्यंत शिक्षण पुण्यातच झालं. 12 वी नंतर त्यांनी मुंबईतील जय हिंद काँलेजमधून मायक्रोबायलाॅजी विषयात Bsc केली. त्यावेळी शऱद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ठाकरे आणि पवार कुंटुंबाचे चांगले संबध होते. याच दरम्यान फॅमिली फ्रेंडच्या माध्यमाथून सुप्रिया यांची सदानंद सुळे य़ांच्यासोबत ओळख झाली. त्यावेळेस संदानद सुळे हे अमेरिकेमध्ये नोकरी करत होते.
सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्या दोघांचा स्वभाव शांत आणि मनमिळावू असल्यामुळे यांच्या मैत्रीचं रूपातंर प्रेमात झालं. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावर होती. मात्र असं असलं शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. हीच मैत्री त्यांनी राजकारणापलिकडे जपली होती.पवारांचं आणि ठाकरे कुटुंबियांच पूर्वी पासून एकमेकांच्या घरी येण जाण असायचं. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि प्रतिभाताई पवार यादेखील सख्ख्या मैत्रिणी होत्या.
सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचे मनं जुळले होते. स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी लग्न ठरवण्यास पुढाकार घेतला. या लग्नाला तसा कोणाचा विरोध नव्हताच. सगळं जुळून आलं. तारीख ठरली गेली. शरद पवारांनी स्वत: अनेक गावात जाऊन सुप्रियाताईच्या लग्न पत्रिका वाटल्या. देशभरातून दिग्गज नेते या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. लाखो लोकांच्या उपस्थितीत 4 मार्च 1991 मध्ये हा दिमाखदार लग्ना सोहऴा पार पडला.
लग्नानंतर सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे अमेरिकेत गेले. सदानंद सुळे यांची नोकरी तिथं सुरू होती. काही काळानंतर सदानंद सुळे यांची सिंगापुरला बदली झाली. सुप्रिया आणि सदानंद सुळे काही काळ तिथे राहिले. त्यानंतर जकार्ताला काही ते नोकरीला होते. मात्र त्यानंतर त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. भारतात परतल्यानंतर सदानंद सुळे यांनी व्यवसाय क्षेत्रात आपलं नशिब आजमावलं. तर, सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय झाल्या.