Sagar sourati Dies: मुंबईचा माजी 16 वर्षांखालील फुटबॉल खेळाडू सागर सोरती (वय अज्ञात) याचा मृतदेह 18 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील मेंढावन खिंड जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेनंतर त्याच्या मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.    

Add Zee News as a Preferred Source

15 नोव्हेंबरपासून बेपत्ता

सागर 15 नोव्हेंबरला “पुण्यात फुटबॉल खेळायला जातो” असे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर त्याचा कुटुंबियांशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाल्याची माहिती जवळच्यांनी दिली आहे.

दोन वर्षांपासून गंभीर मानसिक तणाव

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सागर गेल्या दोन वर्षांपासून गंभीर मानसिक तणावात होता. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी नवीन कपडे शिवण्यासही त्याने नकार दिला होता, अशीही माहिती समोर येत आहे.

मोबाईल फोनमुळे ओळख पटली

मृतदेहाजवळ सागरचा मोबाईल फोन सापडल्याने पोलिसांना त्याची ओळख पटवण्यास मदत झाली. सध्या कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा (Accidental Death Report – ADR) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण व पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.

FAQ 

प्रश्न: सागर सोरतीचा मृतदेह कधी आणि कुठे सापडला?

उत्तर: सागरचा मृतदेह १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पालघर जिल्ह्यातील मेंढावन खिंड जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

प्रश्न: सागर कधीपासून बेपत्ता होता आणि तो कुठे जातोय असे सांगितले होते?

उत्तर: सागर १५ नोव्हेंबर २०२५ रोजी “पुण्यात फुटबॉल खेळायला जातो” असे सांगून घरातून निघाला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला आणि कुटुंबियांचा त्याच्याशी संपर्क तुटला.

प्रश्न: सध्या पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे आणि पुढे काय होणार?

उत्तर: कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा (ADR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण व पुढील कारवाई ठरेल.





Source link