Karale Mastar On Pankaj Bhoyar: कराळे मास्तर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि तुफान भाषणासाठी ओळखले जातात. यावेळी भंडारा येथे झालेल्या सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी कराळे मास्तरांनी पंकज भोयार यांना ‘खादाड’ म्हणून हिणवले. काय म्हणाले कराळे मास्तर? सविस्तर जाणून घेऊया.
आमच्या पालकमंत्री साहेबांनी 67 लाख रुपयांचा एकच लाइट लावला. हा कसला खर्च? मोदींच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या सभेत ग्राउंडवर मुरुम टाकण्याचे आदेश होते, पण ट्रक अडवले. पाण्याच्या कॅन 20-30 रुपयांच्या ऐवजी 150 रुपयांच्या खरेदी केले. 35 हजार खुर्च्या होत्या, प्रत्येक खुर्चीचे 500 रुपयांप्रमाणे भाडे लावले. हे सगळे पैसे कुठे जातात? असा प्रश्न त्यांनी विचारला.
स्मार्ट मीटर योजनेला विरोध
मास्तरांनी स्मार्ट मीटरला खेळणारी योजना म्हटले. मीटरमध्ये सिम कार्ड आहे, रिचार्ज संपले की लाइट कट. जसे मोबाइल बंद पडते. मी स्वतः घरी लावू दिले नाही, फोडून टाकले. एवढेच नव्हे तर प्रत्येक गरीबाच्या घरी जाऊन सांगितले. मीटर रीडर बेरोजगार होतील, कारण डायरेक्ट एमएसईबीला युनिट कळेल. हे मीटर कधीही लाइन कापू शकते, अंधारात राहाल, असा इशारादेखील कराळे मास्तरांनी दिला.
गटार लाइन आणि अमृत योजनेची पोलखोल
अमृत गटार लाइनसाठी 130 कोटींची योजना, पण 800-900 कोटीचे रस्ते खोदले. नवीन रस्ते फोडले, पण काम पूर्ण नाही. मेन रोड उंच, खालचे रोड खाली; इंजिनियरला समजले नाही. ६ इंच पाइप टाकला मग पाणी कसे जाईल? असा प्रश्न विचारत योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली पण अजून चालू नाही. यात सगळा भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले.
रोड आणि ड्रेनेजमधील भ्रष्टाचार
पालकमंत्र्यांच्या आमदार काळात ड्रेनेज पाइपलाइन टाकली, एक फुट रस्ता भरला, सिमेंट लेयर लावला आणि तो रस्ता सहा महिन्यात उकरला. यानंतर काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा नाही. सर्वांनी पैसे खाल्ले. दोनदा रस्ता खराब झाला आणि दुरुस्त केला. सिमेंट रोडवर डांबर प्लास्टर मारलेले जगात कधी पाहिले आहे? पण विधानसभा निवडणुकीत हे झाल्याचे मास्तर म्हणाले.
जागरुक राहण्याचे आवाहन
“काँग्रेसकडून नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उमेदवार उभे केले. हे सरकार गटार लाइनवर भर देते पण भ्रष्टाचार करतात, असे कराळे मास्तर म्हणाले. ज्यातून खाता येत नाही अशा योजना हे चालू करणार नाहीत. जागोजागी भ्रष्टाचार आहे पण आपण हे थांबवू. त्यामुळे लोकांनी जागरुक राहा, असे आवाहन मास्तरांनी केले.
FAQ
प्रश्न: कराळे मास्तरांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर कोणत्या मोठ्या खर्चाबाबत टीका केली?
उत्तर: त्यांनी ६७ लाख रुपयांचा एकच लाईट लावल्याचा आरोप केला. तसेच नरेंद्र मोदींच्या लोकसभा सभेत २०-३० रुपयांच्या पाण्याच्या कॅनऐवजी १५० रुपयांच्या कॅन, ३५ हजार खुर्च्यांचे प्रत्येकी ५०० रुपये भाडे आणि मुरुमचे ट्रक अडवल्याचा गंभीर आरोप केला.
प्रश्न: स्मार्ट मीटर योजनेबाबत कराळे मास्तरांनी लोकांना काय इशारा दिला?
उत्तर: स्मार्ट मीटरमध्ये सिम कार्ड असून रिचार्ज संपले की अर्ध्या रात्रीही लाईट कट होईल, असा दावा त्यांनी केला. स्वतः घरी मीटर लावू दिले नाही, फोडून टाकले आणि गावातील प्रत्येक गरीबाच्या घरी जाऊन मीटर लावू नये असा विरोध केला. “मीटर रीडर बेरोजगार होतील, कधीही लाईट कट होईल” असे त्यांनी सांगितले.
प्रश्न: अमृत गटार लाइन आणि रस्ते फोडण्यात किती भ्रष्टाचार झाल्याचे कराळे मास्तर म्हणाले?
उत्तर: १३० कोटींच्या योजनेसाठी ८००-९०० कोटींचे रस्ते खोदले, नवे-जुने रस्ते फोडले, मेन रोड उंच आणि खालचे रोड खोल असतानाही काम केले, ६ इंच पाईप टाकली पण पाणी जाणे अशक्य, पाच वर्षांपासून काम अपूर्ण, सिमेंट रोडवर डांबर प्लास्टर मारले, दोनदा रस्ते उकरले तरी ठेकेदारांवर कारवाई नाही, असा प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले.