Devendra Fadnavis Government Performance: राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज वर्ष होत आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची धुरा आपल्या हाती घेतली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमन झाले. वर्षभरात तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना नेमकी कशी कामगिरी केली याचा आढावा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली? कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या? सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे? याचा कानोसा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं एका महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? असा प्रश्न विचारला असता सर्वाधिक म्हणजेच 40 लोकांनी सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. तर तब्बल 31 टक्के लोकांनी अतीउत्कृष्ट असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. 23 टक्के लोकांनी साधारण कामगिरी केल्याचं मत नोंदवलं आहे. तर 6 टक्के लोकांनी निराशाजनक म्हटलं आहे. म्हणजेच सरकारच्या कामगिरीवर समाधानी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. 

पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.

तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे.  मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं. 

AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.

महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp