Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: झी 24 तासने समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची विक्री करणा-या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर आता दुय्यम निबंधक रवींद्र तारु याला अटक करण्यात आली आहे. आता तिसऱ्या व्यक्तीला अटक कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
झी २४ तासनं उघड केलेला जमीन गैरव्यवहार प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र तारूला पौड कोर्टात हजर केले जाणार आहे. रवींद्र तारू याने गैरव्यवहार करत दस्त बनवून दिले होते. या संदर्भात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याच्या गोंधळाबरोबरच इतरही अनेक आक्षेप घेतले जात आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. झी 24 तासने बुधवारी रात्रीपासून ही बातमी लावून धरली होती. त्यानंतर काल सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हलली आणि कारवाई सुरू झाला. रात्री मुद्रांक विभागाच्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FAQ
1 पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण काय आहे?
पुणे शहरातील मुंढवा भागात राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमेडिया कंपनीचाही यात समावेश आहे. बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. नायाब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती.
2 या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे ४० एकर जमिनीचा ३०० कोटी रुपयांचा व्यवहार केला असून, त्यासाठी अवघ्या ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार उघडकीस आला, ज्याचा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी डायरेक्ट कनेक्शन आहे. हे नवे प्रकरण पुण्याच्या मुंढवा भागातील आहे.
3 या प्रकरणी कोणत्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?या प्रकरणी दिग्विजय अमरसिंह पाटील (पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार), शीतल तेजवानी (जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेली), निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, रवींद्र तारू यांच्यासह एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमत करून शासनाचा ५ कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा आहे.