BJP MLA Threat Calls For Questioning Tukaram Mundhe: भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खोपडे हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून मुंढेंना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

देवगिरी बंगल्यावर शिंदेंची भेट

नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएस अधिकारी तुकाराम मुंढेबाबत खळबळजनक दावा केल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंडेंविरोधात लक्षवेधी लावली होती. खोपडेंनी तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. कृष्णा खोपडे यांनी सोमवारी दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर त्यांनी ही भेट घेतली. मुंढे यांच्या समर्थकांकडून मराठवाड्यातून धमकी दिल्याचा कृष्णा खोपडे यांचा आरोप असून त्यांनी आपलं म्हणणं उपमुख्यमंत्र्‍यांसमोर मांडल्याचं समजतं. 

फोनवरुन धमक्या देण्यात आल्या

सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडण्याची येण्याची भूमिका घेणारे आमदार कृष्णा खोपडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमकीचे फोन आल्याचा दावा केला आहे. मुंडेंच्या निलंबनाची मागणी का करत असल्याचा सवाल करत दोन जणांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी लावू नका, तक्रार करू नका अशा धमक्या फोनवरुन देण्यात आल्याचा दावा खोपडेंनी केला आहे. या प्रकरणी खोपडे पोलिसात तक्रार करणार आहेत.  

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

फोनवरून धमकीप्रकरणी खोपडे यांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. तसेच बर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केल्याचं त्यांनी सांगितले.

कठोर निर्णयांमुळे राजकारणींशी मुंढेंचा सतत संघर्ष

तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या छोट्या गावात झाला. ते शेतकरी कुटुंबातून आले असून, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून राजनीती शास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. मुंढे यांनी राजनीती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ऑगस्ट 2005 मध्ये ते आयएएस सेवेत रुजू झाले. त्यांच्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांना अनेक वेळा ट्रान्सफर मिळाल्या आहेत. 2025 पर्यंत त्यांना 23 वेळा ट्रान्सफर झाल्या आहेत, ज्यामुळे ते अशोक खेमका यांच्या सारखे चर्चेत राहिले आहेत. मुंढे यांना प्रामाणिकपणा आणि कठोर निर्णयांमुळे राजकारणी आणि सहकाऱ्यांशी संघर्ष होतो. त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे ट्रान्सफर होतात, असे म्हटले जाते. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp