चंद्रकातं फुंदे, पुणे, प्रतिनिधी

Add Zee News as a Preferred Source

TOP 10 Gangs of Criminals in Pune : पुणे महापालिकेची निवडणुक सध्या चर्तेत आहे ती गुन्हेगारांमुळे. पुण्यात निवडणूक लढवत असलेल्यांपैकी 60 जणांवर विविध गुन्हे दाखल असून त्यापैकी 20 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 महिला या आंदेकर टोळीतील असून त्या दोघीही तुरूंगातून निवडणूक लढवताहेत तर तर गुंड गजा मारणेची पत्नी ही देखील रिंगणात हे याशिवाय बापू नायर हा तर रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे…हे चौघेही राष्ट्रवादी चे उमेदवार आहेत तर भाजपने रोहिदास चोरगे या गुन्हेगाराच्या पत्नीला तिकिट दिले.

पुणे महापालिका निवडणुकीत काही गुन्हेगार नगरसेवक म्हणून निवडून आले तरी पोलिसांच्या लेखी ते गुन्हेगारच असतील त्यांच्यावरील कारवाईत कोणताही फरक पडणार नाही, असा सज्जड दमच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे मनपा निवडणुकीतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची यादी शासनाला पाठवली असून पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर आहे असंही पोलीस आयुक्त म्हणालेत.

दरम्यान, बाणेर परिसरात पैसे वाटप सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे आली असून पोलीस त्याचा कसून शोध घेताहेत, असंही पोलीस आयुक्तांनी झी 24 तासशी बोलताना स्पष्ट केले .पुणेकरांनी निर्धोक होऊन मतदान करावं, असंही आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या TOP 10 टोळ्या

1. बंडू आंदेकर टोळी, नानापेठ, 52 सदस्य, 1970 पासून active 
बंडू आंदेकर आत्ताच नातवाच्याच खूनाच्या आरोपात जेलमध्ये गेलाय

2. निलेश घायवळ गँग, कोथरूड, 40 सदस्य
घायवळ गँग 2004 पासून active, म्होऱ्हक्या निलेश घायवळ सध्या जेलबाहेर हे)

3. गजानन मारणे गँग, शास्रीनगर, कोथरूड, 75 सदस्य 
2001 पासून Active असून खंडणीप्रकरणी पुन्हा जेलमधे…

4. गणेश मारणे गँग, वारजे & कर्वेनगर, 38 सदस्य
2005 पासून active असून शरद मोहोळ खून प्रकरणी गणेश मारणे पुन्हा जेलमध्ये….

5. शरद मोहोळ टोळी, मुळशी, सुतारदरा, 28 सदस्य, 2015 पासून active, पण शरद मोहोळचा 5/1/2024 रोजी खून…

6. बंटी पवार गँग, 26 सदस्य, 2015पासून सिंहगड रोड परिसरात active, बंटी पवार सध्या जेलमधे…

7. बाबा बोडखे गँग, पुणे, सदस्य 56, बाबा बोडके गँग ऑन रेकॉर्ड निष्क्रिय…बाबा बोडकेची राजकारणात येण्यासाठी धडपड सुरूच…

8. उमेश चव्हाण उर्फ घिसाडी, 2011पासून रविवार पेठ, 11 सदस्य, म्होरक्या उमेश घिसाडी सध्या जेलबाहेर…

9. बापू नायर गँग, 45 सदस्य, 2001 पासून बिबवेवाडीत active, म्होरक्या सध्या जेलबाहेर 

10. अन्वर नया(मयत), कोंढवा भागात 2009 पासून अँक्टिव्ह होता, सदस्य 10 active 

11. खडा वसीम उर्फ रफिक शेख 2007 पासून कोंढवा भागात 11 सदस्यांस





Source link

YouTube
Instagram
WhatsApp