Raj Thackeray Allegations on Gautam Adani: नवी मुंबईचं सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ बांधलेलं नाही. गन पॉइंटवर ती आपल्याकडे घेतली आहेत. पोर्ट गुजरातमधील मुंद्रा फक्त एकच आहे. बाकी देशभरातील दुसऱ्यांची होती, गन पॉईंटवर मला हवी सांगितलं. या माणसाचं स्वतचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव. या एका गोष्टीवर माणूस देशभर पसरत गेला आहे असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ठाण्यातील शिवशक्तीच्या सभेत राज ठाकरेंनी गौतम अदानी मागील 10 वर्षात कसे मोठे झाले याचा पाढाच वाचला.
‘अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही’
“मी काल जे दाखवलं ते इतकं भयनाक भीषण आहे. ज्या वेळी या महाराष्ट्रात, मुंबई, ठाण्यावर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती वैगैरे पाहणार नाही. अदानीशी मैत्री करण्याचा विषयच नाही. मी इतका अडाणी नाही. ते काल दाखवलं त्याचं गांभीर्य समजून घ्या. हा माणूस कधी सिमेंटमध्ये नव्हता, आता दोन नंबरचा व्यापारी आहे. आज सगळी विमानतळं आहेत. हे जे डाव रचत आहेत त्याविरोधात इथळ्या गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. पण हे मुद्दामून गोष्टी करत आहेत. आता सहा ते आठ विमानतळं त्यांना दिली आहेत. नवी मुंबईचं सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ बांधलेलं नाही. गन पॉइंटवर ती आपल्याकडे घेतली आहेत. पोर्ट गुजरातमधील मुंद्रा फक्त एकच आहे. बाकी देशभरातील दुसऱ्यांची होती, गन पॉईंटवर मला हवी सांगितलं. या माणसाचं स्वतचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव. या एका गोष्टीवर माणूस देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली तर व्यापार ठप्प, वीज निर्माण करणारा गौतम अदानी गेला तर सगळे अंधारात. मग तक्रार कोणाकडे करायची?,” असा प्रश्न त्यांनी विचारला.
‘भवितव्य अदानी ठरवणार’
“महिन्याभरापूर्वी इंडिगोच्या विमानाचा स्ट्राइक झाला. हवाई वाहतुकीमधील 65 टक्के हवाई वाहतूक इंडिगोकडे दिली आहे. त्यांनी स्ट्राइक केला, कारणं दिली नाही. अख्खा देश ठप्प झाला. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करु शकते. अदानींच्या हातात सिमेंट, वीज, विमानतळं, पोर्ट्स आहेत. उद्या जर हे भाव वाढवू लागले तर घरांच्या किमती वाढणार. तुमचं भवितव्य अदानी ठरवणार. ह एक माणूस या देशात फक्त 2014-2025 मध्ये 10 वर्षात मोठा होतो. इतका मोठा, श्रीमंत, उद्योग उभारलेला दुसरा माणूस नाही. टाटा, बिर्ला यांना 50, 100 वर्ष लागली,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
‘बाकीचे उद्योगपती मेले का?’
“मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवत कशाप्रकारे मतदान होत आहे दाखवलं. वाढवणला विमानतळ होत आहे. सांताक्रूझ विमानतळ नवी मुंबईला नेणार आणि नंतर विकायला काढणार. आता अदानीकडे आहे. या देशात उद्योगपती मोठे व्हावेत पण एक नाही तर सगळे. या देशात उद्योग, पैसा आला पाहिजे. रोजगार निर्माण होतो, त्यांची घऱं उभी राहतात. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. पण एकावरच मेहरबानी का हे विचारणारा आहे. बाकीचे उद्योगपती मेले का? मग या माणसाला पुढे करायचं आणि वेगळे डाव आखायचे. महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा भुगोल पाहा. वाढवणच्या पुढे लगेच गुजरात लागतं. ही आपली मराठी शहरं, याचा मराठी ठसा यांना पुसायचा आहे,” असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
‘जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे’
“भाषावर प्रांतरचचना झाली तेव्हा प्रत्येत भाषेचं एक राज्य निर्माण झालं. 107 हुतात्म्यांच्या लढ्यानंतर मुंबई मिळाली. मुंबईत महाराष्ट्राची असतानाही ओरबाडत होते. प्रत्येक राज्याची एक भाषा, स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला नख लावत आहात. नवरात्रीच गरबा खेळला जातो. आपलेही लोक जातात. चांगली गोष्ट आहे. पण तो आनंदाचा, सणाचा विषय आहे. पण मुंबई विमानतळावर जेव्हा गौतम अदानीने ताब्यात घेतलं, तुम्हाला काय सांगायच होतं त्यातून ही कृती केली. मुंबई विमानतळावर गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची आहे. गणपतीमध्ये ढोल लेझीम वाजवले का? जर वाजवायचे असतील तर ढोल लेझीमच वाजले पाहिजे. ही मुंबई, ठाणे मराठी माणसाचं आहे. कपाट दुरुस्त करायला याचं आणि बाकोवर नजर टाकायची हे चालणार नाही,” असं त्यांनी खडसावलं.
‘एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे?’
“घोडबंदरला एक हजार एक जमीन उद्योजकाला विकत आहेत. गणेश नाईकांना होऊ देणार नाही संगितलं ही आनंदाची बाब आहे. एकनाथ शिंदेंना हे करायचं आहे. त्यांच्या ओळखीतलाच आहे. जी दिसले ती जमीन घ्यायची आहे. वरुन पाठवणार आणि या उद्योगपतीला द्या सांगणार. ताडोबाची जमीन खाणींना दिली. उद्योगपती आला आणि सह्या द्यायला सांगितलं. जिथे गौतम अदानी पाहणार ती जमीन देत आहेत. एकाच माणसावर इतकी मेहरबानी का? तो काय देत आहे? ही सर्व शहरं गुजरातला मिळवायची आहेत. ठाणे, पालघर हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही. भौगोलिकदृष्ट्या काय सुरु आहे. त्यामुळे ते करत आहेत. आपण या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे,” असं आवाहन त्यांनी केलं.