Amit Thackeray Warning to Double Voters: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी महापालिकात निवडणुकीत दुबार मतदार करणाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. दुबार मतदार दिसला तर फोडणारच असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे प्रत्येक सभेतून दुबार मतदारांना थोबडवण्याचा इशारा देत असताना, आता अमित ठाकरेही तीच भाषा बोलताना दिसत आहेत. नगरपालिका निवडणुकांपासूनच महाविकास आघाडीचे नेते दुबार मतदानाचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि मनसे त्यांना फटके लगावणार असल्याचं सांगत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

“दुबार मतदारांना तिथल्या तिथे फोडणार असं अमित ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ते म्हणाले की, “दुबार मतदारांना आम्ही तिथल्या तिथे फोडणार. अनधिकृतपणे तुमच्यासोबत रांगेत उभं राहून मतदान करणार. मग तुमच्या आमच्या मतदानाचा हक्क कुठे गेला? आपल्या मतदानाची काय किंमत राहिली?,” अशी विचारणा अमित ठाकरेंनी केली आहे. 

“जर बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्यालाच सांगणार असतील की, हा माणूस आपल्यावर राज्य करणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही 40 लाख मतदार घुसवलेत. विकास केल्यानंतरही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून. हे छान चालू आहे तुमचं,” अशी टीकाही त्यांनी केली आहे. 

राज ठाकरेंचंही सावध राहण्याचं आवाहन

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेत भाषण करताना दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच आवाहन केलं होतं. माझं सगळ्यांना सांगणं आहे की, बेसावध राहू नका. ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचे बीएलए सकाळी सहा वाजता मला मतदान केंद्रावर हवे आहेत. या सगळ्यांनी दुबार मतदारांबाबत सतर्क राहावे. अजिबात बेसावध राहू नका. एखादा दुबार मतदार तिकडे आला तर, सकाळी सात वाजता त्याला फोडून काढा, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. ठाण्यातील सभेतही त्यांनी भाषणाच्या शेवटी दुबार मतदान करायला आले तर तिथेच थोबडवा असं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. 

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की, आम्ही मतदान केंद्रावरील आमच्या बीएलओंना दुबार मतदारासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मतदार यादीत लाल रंगाचे निशाण असलेला मतदार आला की, बाहेर ‘गोंद्या आला रे आला’, असा मेसेज द्या. दुबार मतदार दोन पायांवर चालत येईल, पण परत जाताना स्ट्रेचरवरुन जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp