चंद्रकांत फुंदे झी 24 तास पुणे : पुण्यातल्या भाजप-राष्ट्रवादीमधला वाद थेट दिल्लीत जाणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिल्यानंतर वार-पलटवार सुरू झाले आहेत. दादांच्या दिल्लीवारीच्या संकेतानंतर फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान यानंतर अजित पवारांनीही त्यांच्याखास शैलीत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.
अजित पवारांची
दिल्लीवारी?
फडणवीसांची टोलेबाजी
गल्लीतला वाद
दिल्लीपर्यंत
गाजवणार?
अजितदादा दिल्ली
जाणार, फडणवीस
तिकीट काढणार?
पिंपरी-चिंचवड पालिकेवरून अजित पवारांनी भाजपवर आरोपांची राळ उठवलीय. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी-भाजपमध्ये चांगलीच जुंपलीय. अजित पवारांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर भाजपनं देखील अजित पवारांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत थेट इशारा दिलाय, मात्र, राष्ट्रवादीमधला हा वाद दिल्ली दरबारी जाणार असल्याचे संकेत झी २४ तासच्या टू द पॉईंटमधून अजित पवारांनी दिली होते, दरम्यान यानंतर फडणवीसांनी देखील अजित पवारांच्या या वक्तव्यावर टोले लगावले आहेत. अजित पवारांनी जरूर दिल्लीत जावं त्यांचं तिकीटही मीच काढून देतो, मात्र त्यांनी भाजप नेत्यांकडेच जावं दुसरीकडे गेल्यास विचार करावा लागेल असं सूचक विधान त्यांनी
केलंय.
दादांच्या दिल्लीचं तिकीट फडणवीस काढणार?
भाजपनं युतीधर्म पाळला,
राष्ट्रवादीनं पाळलेला नाही
फडणवीस यांच्यासोबतही
चर्चा करू, दिल्लीतही जाऊ
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावल्यानंतर दादा थोडीच मागे राहणार आहेत. अजित पवारांनी देखील देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर पलटवार केलाय, पुणेकर, पिंपरी-चिंचवडकर असा रिझल्ट देतील आम्हाला कुठे जाण्याची गरज नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.
टू द पॉईंटमधून अजित पवारांनी भाजप-राष्ट्रवादी वादासंदर्भात दिल्लीत जाण्याचे संकेत दिल्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापलंय, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावत सूचक इशारा दिला, तर दादांनी देखील फडणवीसांवर पलटवार करत थेट उत्तर दिलं.